शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गुलाबी थंडीत ‘रोमान्स’च्या शोधात गवा पुण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:10 AM

प्रेमाच्या शोधात ‘सोनेरी राजपुत्र’भटकंती करत आला पुण्यात ! डिसेंबर महिना प्रजननाचा काळ; मादीच्या शोधात गवे फिरतात एकटे श्रीकिशन काळे ...

प्रेमाच्या शोधात ‘सोनेरी राजपुत्र’भटकंती करत आला पुण्यात !

डिसेंबर महिना प्रजननाचा काळ; मादीच्या शोधात गवे फिरतात एकटे

श्रीकिशन काळे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कधी न दिसणारा गवा जेमतेम पंधरवड्यात दोनदा पुण्यात आल्याने खूप ‘गवगवा’ झाला. पुणे जिल्ह्यात गव्यांचा अधिवास नसल्याचे मानले जात असल्याने हे गवे पुण्याकडे का आणि कुठून आले असा प्रश्न यामुळेच निर्माण झाला. खरे तर कळपाने राहणारा हा प्राणी. पण एकटा रानगवा असेल तर तो कशाच्या शोधात फिरतो? याबद्दलची ‘रोमँटिक’ अंदाज वर्तवला जात आहे. तो म्हणजे नर गव्याला मादी गव्याची आस असावी, ‘तिच्या’ शोधातच तो पुण्यापर्यंत येऊन धडकला असावा, असे सांगण्यात येत आहे.

डिसेंबर ते जून हा गव्यांचा प्रजनन काळ आहे. या कालावधीत नर गव्याला मादीची साथ हवी असते. या प्रेमाच्या ओढीतूनच दोन रानगवे पुण्याकडे आले असण्याची शक्यता आहे.

वन विभागाने २०१५ मध्येच गव्याला पकडण्याच्या कार्यपध्दतीबाबत २६ पानी मसुदा तयार केला आहे. गवा शहरात आल्यावर काय करावे, कोणाची काय जबाबदारी असते, त्याला कसे पकडावे याची माहिती यात आहे. पण याची कल्पना पुण्यातल्या वनाधिकाऱ्यांना नसल्याने पुण्यात दोनदा आलेल्या गव्याच्या घटनेवरुन स्पष्ट झाले. गवत, पाने, फळे, खोड आणि झाडाची साल यावर जगणारा गवा स्वभावाने तसा शांत असतो. सागवानाची साल गव्यांना विशेष आवडते. पश्चिम पुण्याजवळच्या वनक्षेत्रात सागाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून उन्हे चढेपर्यंत म्हणजे नऊ-दहापरर्यंत आणि संध्याकाळी उन्हे उतरल्यानंतर तिन्ही सांजेपर्यंत गवे चरतात. इतरवेळी रवंथ करतात, विश्रांती घेतात, असे प्राणीतज्ज्ञांनी सांगितले.

चौकट

कळपाने राहणारा नर गवा एकटा का फिरतो?

वनखात्याच्या अहवालानुसार एकटा फिरणारा गवा हा शक्यतो नरच असतो. त्याला ‘एकुल’ म्हणतात. थंडीपासून गव्यांचा प्रजनन काळ चालू होतो. तो साधारणत: जूनपर्यंत चालतो. या कालावधीत नर-मादी एकत्र येतात. या कालावधीत माजावर येणाऱ्या गव्यांना मादीचा शोध असतो. एरवी कळपाने राहणारे गवे ‘तिच्या’ शोधात ते एकटेच फिरतात.

चौकट

मादीसाठी अनेकदा होते झुंज

पुण्यात आलेले दोन्ही गवे एकटे होते. गव्यांचे पाय खूप मजबूत असतात. कित्येक किलोमीटरचे अंतर ते न थकता कापतात. नर गव्यांमध्ये मादीवरुन अनेकदा झुंजी लागतात. यावेळी अंगात जबरदस्त रग असलेला धिप्पाड गवा कमजोर गव्याला हुसकावून लावतो आणि स्वत: मादीसोबत रत होतो. अधिवासातून हुसकावून लावलेला गवा दुसऱ्या मादीच्या शोधात भटकत राहण्याची शक्यता असते. दोन नर गव्यांची झुंज लागते तेव्हा ते अनेकदा हंबरतात. हा आवाज एवढा मोठा असतो की तो एक-दीड किलोमीटर अंतरावरही ऐकू येऊ शकतो.

चौकट

पुण्यात अधिवास नाहीच

“पुणे परिसरात गव्याचा अधिवास नाही. ताम्हिणीत काही प्रमाणात दिसतात. त्यामुळे कळपात राहणारे गवे आपल्याकडे एकटे भटकत आले असणार. आपल्याकडे त्यांची संख्या कमी आहे. शहरात गवे आल्यावर त्याला पकडण्याच्या कार्यपध्दतीचा मसुदा मी तयार केला आहे. त्यात गव्याविषयी सर्व माहिती आहे.”

-रंगनाथ नाइकडे, वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, पुणे

चौकट

गायीला ‘भुलला’ का?

मंगळवारी (दि. २२) बावधन परिसरात रानगवा आढळल्यानंतर त्याच्या जवळ दोन गायी सोडण्यात आल्या. गवा आणि गोवंश यांचे कुळ भिन्न असल्याने त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण होत नाहीत. मात्र साधर्म्य असणाऱ्या प्राण्यांचा सहवास लाभल्याने गवा शांत राहण्यास मदत झाली असावी, असे प्राणीतज्ज्ञांनी सांगितले.