गेल्या ४ दिवसांपूर्वी विकास टुले यांची शेळी बिबट्याने ठार मारली, तर जवळच लव्हटे वस्ती, देलवडी येथे देखील गायीचे वासरू ठार मारले. या परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याला लपण्यास मोठी जागा आहे. पाळीव प्राण्यावर सध्या बिबट्यांचे हल्ले या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने बिबट्याची दहशत या भागात वाढली आहे. शेतकरी आणि मजूर या भीतीने शेतात जाण्यास व एकटे फिरण्यास घाबरत आहेत.
परिसरातील हल्ल्यांची संख्या पाहता या परिसरात पिंजऱ्याची अत्यंत आवश्यकता आहे. वनविभागाने पिंजरे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. मात्र ग्रामपंचायतद्वारे पिंजऱ्याची मागणी करून वनविभागाने वरिष्ठ पातळीवरून हालचाल कराव्यात व पिंजरा उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी संजय वाघोले यांनी केली.
--
कोट
रात्री-अपरात्री एकट्याने उसासारख्या पिकांमध्ये प्रवेश करणे टाळावे, जेथे बिबट्याचा अधिवास असल्याची भीती आहे अशा ठिकाणी रात्री फटाक्यांचा आवाज करावा. बंदिस्त गोठ्यामध्ये जनवारांना बांधावे व मुलांना एकट्याने बाहेर सोडू नये.
नाना चव्हाण, शिवकुमार बोंबले, वनरक्षक.