चाकण (पुणे) :चाकण औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीच्या गोडाऊनचे शटर उचकटून तब्बल २५ लाख रुपयांचे टीव्ही संच चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंदराव रत्नलाल माळी (वय ३८, रा. ग्रीन इस्टेट सोसायटी, चाकण, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे-नाशिक महामार्गाजवळील कुरुळी गावच्या हद्दीतील बर्गेवस्ती, हॉटेल महिंद्रा गार्डन लगत कंपनीचे गोडाऊन आहे. शनिवारी (दि. २२ जुलै) रात्री ९ ते रविवारी (२३ जुलै २०२३) सकाळी १० दरम्यान गोडाऊनचे शटर उचकटून एकूण २५ लाख १७ हजार ८७ रुपये किमतीचे एकूण ११ टीव्ही संच चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.