अवसरी : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय कॉलेज विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुलींना रोडरोमिओंचा त्रास सहन करावा लागत असून एकट्या मुलीला कॉलेजला जाणे मुश्कील होत आहे. मंचर पोलीस ठाण्याने मोटार सायकलवर फिरणाºया रोडरोमिओंचा शोध घेऊन कडक कारवाई करावी; तसेच मोटारसायकली जप्त कराव्यात, अशी मागणी पालकवर्ग करीत आहे.शासकीय कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी राज्यातून; तसेच राज्याबाहेरील मुली अवसरी, मंचर परिसरात वास्तव्यास आहेत. वास्तव्यास असणाºया मुली एक किलोमीटर चालत कॉलेजला पायी ये-जा करीत असतात. या वेळी त्याचप्रमाणे मोटारसायकलला कर्कश आवाजाचा हॉर्न बसविलेला असतो, रोडरोमिओ गावातून हॉर्न वाजवतच मुख्य बाजारपेठ रस्त्यावरून वेगाने पळवित असतात.रोडरोमिओंना गावातील पुढाºयांची व पालकांची अडविण्याची हिंमत होत नाही. रोडरोमिओ दहा मिनिटांत भ्रमणध्वनीवरून ६० ते ७० मुले गोळा करून दहशत पसरवत आहेत. गावातील मुलांपेक्षा बाहेरगावावरून येणाºया मोटारसायकली जास्त आहेत, तर काही रोडरोमिओंनी मोटारसायकलच्या सायलन्सरमध्ये बदल करून फटाक्यासारख्या आावजाचा सायलन्सर बसवून गावात दहशत निर्माण करीत आहेत.गावातील रोडरोमिओंचा शोध घेऊन मंचर पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी; तसेच रात्री उशिरा १२ ते १ वाजेपर्यंत टोळक्यांचा शोध घ्यावा. अवसरी येथील शासकीय कॉलेज व भैरवनाथ विद्यालय परिसरात मोटारसायकलवरून विनाकारण फिरणाºया, मुलींना त्रास देणाºया रोडरोमिओंची गय केली जाणार नाही. तसेच पुढाºयांच्या दबावाला न जुमानता रोडरोमिओंवर कायदेशीर कारवाई केली जाईल. मोटारसायकलवरून फिरणाºया रोडरोमिओंचा शोध घेण्यासाठी अवसरी गावात कॉलेज-विद्यालय परिसरात साध्या वेशात पोलीस तैनात केले जाणार असून, रोडरोमिओ व मोटारसायकलमालकांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे काम चालू आहे. कॉलेज व विद्यालयीन मुलींनी घाबरून न जाता मंचर पोलीस ठाण्याच्या 0२१३३-२२३१५९ या भ्रमणध्वनीवर मोटारसायकल नंबर कळवावा. कायद्यापुढे कोणीही मोठा नाही हे दाखवून दिले जाईल. गावातील पुढाºयांनी, स्थानिक स्कूल कमिटी व शाळा समिती अध्यक्षांनी मंचर पोलीस ठाण्याला सहकार्य करावे, असे आवाहन मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ यांनी केले आहेकॉलेजच्या वॉचमनला दमदाटीरोडरोमिओ मोटारसायकलवरून सुसाट मुलींना कट मारून जातात. काही मुले आलिशान चारचाकी गाड्या घेऊन विनाकारण कॉलेज परिसरात घिरट्या घालत असतात. या रोडरोमिओंवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने कॉलेजच्या आवारात वॉचमनला दमदाटी करून गाड्या आत आणतात. तसेच, गावात श्री भैरवनाथ विद्यालय व सायन्स कॉलेज असल्याने याही ठिकाणी विद्यालय आहे. सुटते वेळी रोडरोमिओ मोटारसायकलवरून मुलींना कट मारून जातात. तसेच, विद्यालय परिसरातही रोडवर घिरट्या घालत असतात.
कॉलेजला जाणे मुश्कील, मुलींना रोडरोमिओंचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 2:28 AM