पुणे : शहरात २९ जून रोजी बकरी ईद साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने मुस्लीम बांधव सामूहिक नमाज पठणासाठी गोळीबार मैदानावरील ईदगाह येथे मोठ्या संख्येने एकत्र येतात. या परिसरात वाहनांची गर्दी होते. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. तसेच शहरातील महत्त्वाच्या मशीद परिसरात या भागातील वाहतुकीच्या परिस्थितीनुसार तेथील वाहतूक बंद अथवा अन्य मार्गाने वळविण्यात येत असल्याचे पोलिस उपायुक्त विजयकुमार बोत्रे यांनी कळविले आहे.
- मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान चौक ते ढोले पाटील (सेव्हन लव्हज) चौक दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक सकाळी ६ वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
- गोळीबार चौकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी डावीकडे वळून सीडीओ चौक, उजवीकडे वळून गिरीधर भवन चौक, पुढे उजवीकडे वळून सेव्हन लव्हज चौकातून इच्छित स्थळी जावे.
- सीडीओ चौकातून गोळीबार चौकाकडे येणारी वाहने लुल्लानगरकडून येथून खान्या मारुती चौकाकडे जाणारी वाहतूक खटाव बंगला चौक, नेपीयर रोड, मम्मादेवी चौक, बिशप स्कूलमार्गे किंवा वानवडी बाजार चौक, भैरोबानाला येथून किंवा गिरीधर भवन चौकातून इच्छित स्थळी जातील.
- सेव्हन लव्हज चौकाकडून येणारी वाहने सॅल्सबरी पार्क, सीडीओ चौक, भैरोबानाला येथून इच्छित स्थळी जातील.
- सोलापूर रोडने मम्मादेवी चौकातून गोळीबार चौकाकडे जाणारी वाहने मम्मादेवी चौक, बिशप स्कूलमार्गे किंवा जुने कमांड हॉस्पिटलमार्गे जातील.
- भैरोबानाला ते गोळीबार चौकातून येणारी वाहने प्रिन्स ऑफ वेल्स रोडने (एम्प्रेस मार्डन रोड) किंवा भैरोबानाला-वानवडी बाजार, लुल्लानगर येथून इच्छित स्थळी जातील.
- कोंढवा परिसरातून येणारी वाहने लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौकमार्गे किंवा गंगाधाम चौकातून इच्छित स्थळी जातील.