शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

महाराष्ट्राच्या आर्यनचा विक्रमासह सुवर्ण

By admin | Published: July 05, 2017 3:39 AM

महाराष्ट्राचा आर्यन भोसले, कर्नाटकच्या श्रीहरी नटराज व पश्चिम बंगालच्या स्वदेश मोंडल यांनी आपआपल्या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी

 लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महाराष्ट्राचा आर्यन भोसले, कर्नाटकच्या श्रीहरी नटराज व पश्चिम बंगालच्या स्वदेश मोंडल यांनी आपआपल्या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करीत नवीन विक्रम प्रस्थापित करून सुवर्णपदक पटकावित ४४व्या ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचा मंगळवारचा दिवस गाजविला. दुसरीकडे महाराष्ट्राच्या रेना सलढाणा, त्रिशा कारखानीस, आर्यन भोसले, केनिशा गुप्ता, नील रॉय यांनी आपआपल्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला.भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या वतीने म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात जलतरण तलाव सुरू असलेल्या या स्पर्धेत ४०० मी फ्रीस्टाइल प्रकारात मुलींच्या १५-१७ वयोगटात महाराष्ट्राच्या रेना सलढाणाने ४.४५.४२ सेकंद वेळ नोंदवीत सुवर्णपदक संपादन केले तर तमिळनाडूच्या अभिशिक्ता पी.एम. व दिल्लीच्या प्राची टोकस यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले.२०० मी फ्रीस्टाइल प्रकारात कर्नाटकचे वर्चस्व मुलांच्या १५-१७ वयोगटात कर्नाटकच्या राहुल एम याने १.५६.२५ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले, तर दिल्लीच्या कुशाग्रा रावतने रौप्यपदक पटकावले तर महाराष्ट्राच्या आरोन फर्नांडिसला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलांच्या १३-१४ वयोगटात कर्नाटकच्या तनिश मॅथ्यूने २.०१.४६ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. तमिळनाडूच्या लिओनार्ड व्ही व हरियाणाच्या वीर खाटकर यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले. २०० मी बॅकस्ट्रोक प्रकारात मुलींच्या १५-१७ वयोगटात महाराष्ट्राच्या त्रिशा कारखानीसने २.२७.५३ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले तर पश्चिम बंगालच्या सौब्रीती मोंडल व कर्नाटकच्या झानती राजेश यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले. २०० मी. बॅकस्ट्रोक प्रकारात मुलांच्या १५-१७ वयोगटात कर्नाटकच्या श्रीहरी नटराजने आपलाच २.०५.१८ सेकंदाचा विक्रम मोडीत काढत २.०४.११ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. श्रीहरीने सकाळच्या सत्रात झालेल्या प्राथमिक फारीत २.०५.१८ सेकंदांचा विक्रम केला होता. मध्य प्रदेशच्या अद्वैत पागे व गोव्याच्या झेविअर डिसुझा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले. मुलांच्या १३-१४ वयोगट महाराष्ट्राच्या आर्यन भोसलेने २.११.९७ सेकंद वेळ नोंदवत विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले. आर्यनने सकाळच्या सत्रात झालेल्या प्राथमिक फेरीत २.१३.७७ सेकंदांचा विक्रम केला होता. तर महाराष्ट्राच्याच वेदांत बाफनाने २.१३.५० सेकंदासह रौप्यपदक संपादन केले. पंजाबच्या आकाशदीप सिंगने कांस्यपदक पटकावले. २०० मी मिडले प्रकारात मुलांच्या १५-१७ वयोगटात महाराष्ट्रच्या नील रॉयने २.११.१६ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. वेदांत खांडेपारकरने २.१३.५६ सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले. कर्नाटकच्या सीवा एस याने २.१४.४३ सेकंदासह रौप्यपदक पटकावले. नील जमुनाबाई शाळेत अकरावी इयत्तेत शिकत असून, खार जिमखाना येथे प्रशिक्षक देवदत्त लेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. गतवर्षी त्याने बेस्ट स्वीमरचा पुरस्कार पटकावला होता.२०० मी. मिडले प्रकारात मुलांच्या १३-१४ वयोगटात पश्चिम बंगालच्या स्वदेश मोंडलने २.१५.२८ सेकंद वेळ नोंदवत महाराष्ट्राच्या नील रॉयचा २०१५ सालचा २.१७.२० सेकंदाचा विक्रम मोडीत काढत सुवर्णपदक संपादन केले. महाराष्ट्राच्या आर्यन भोसलेने २.१८.७९सेकंदासह रौप्य तर गुजरातच्या आर्यन नेहराने कांस्य पदक पटकावले. २००मी मिडले प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींनी बाजी मारली. मुलींच्या १५-१७ वयोगटात महाराष्ट्रच्या रेना सलढाणाने २.२९.८८सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. तर कर्नाटकच्या तन्वी तांत्री व झानती राजेश यांनी २.३३.५५सेकंद वेळ नोंदवत अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलींच्या १३-१४ वयोगट महाराष्ट्रच्या केनिशा गुप्ताने २.३१.३४सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. तेलंगणाच्या जान्हवी गोली व महाराष्ट्रच्या सिया बिजलानीने अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. सविस्तर निकाल- ४०० मी फ्रीस्टाईल मुली (१५-१७ वयोगट)- १. रेना सलढाणा (महाराष्ट्र, ४.४५.४२ से), २. अभिशिक्ता पी.एम. (तमिळनाडू, ४.४७.६२ से), ३. प्राची टोकस (दिल्ली, ४.४७.९४.से); ४००.मी फ्रीस्टाईल मुली (१३-१४ वयोगट)- १. खुशी दिनेश(दिल्ली, ४.४१.७३ से), २. आस्था चौधरी (आसाम, ४.४६.९१से), ३. पूजिता मूर्ती (कर्नाटक, ४.५०.९१.से); ४७१०० मी. मिडले रिले मुले (१३-१४ वयोगट)-१. कर्नाटक (शिवांश सिंग, लितेश गौडा, प्रसिधा कृष्णा पी.ए., तनिश मॅथ्यू, ४.१४.६९ से), २. महाराष्ट ्र(वेदांत बाफना, सुदर्शन हर्शित, यश गल्हानी, आर्यन भोसले, ४.२४.८१ से), ३. पश्चिम बंगाल (नितेश भौमिक, आरिंदम दास, स्वदेश मोंडल, साकील सरदार, ४.२६.७३ से); २०० मी फ्रीस्टाईल मुले (१५-१७ वयोगट)- १. राहुल एम. (कर्नाटक, १.५६.२५ से), कुशाग्रा रावत (दिल्ली, १.५६.३५से), ३. आरोन फर्नांडीस (महाराष्ट्र, १.५७.२६ से); २०० मी फ्रीस्टाईल मुले (१३-१४ वयोगट)- १. तनिश मॅथ्यू (कर्नाटक, २.०१.४६ से), लिओनार्ड व्ही. (तमिळनाडू, २.०४.६५से), ३. वीर खाटकर (हरियाणा, २.०४.९५ से); २००मी बॅकस्ट्रोक मुली (१५-१७ वयोगट)- १. त्रिशा कारखानीस (महाराष्ट्र, २.२७.५३से), २. सौब्रीती मोंडल (पश्चिम बंगाल, २.३०.१३से), ३. झानती राजेश (कर्नाटक, २.३०.२७ से); २०० मी बॅकस्ट्रोक मुली (१३-१४ वयोगट)- १. तनिशा मालवीया(दिल्ली, २.२८.९८ से), २. सुवाना बस्कर (कर्नाटक, २.३१.१९से), ३. श्रृंगी बांदेकर (गोवा, २.३१.८१ से); २००मी बॅकस्ट्रोक मुले (१५-१७ वयोगट)- १. श्रीहरी नटराज (कर्नाटक, २.०४.११ से), २.अद्वैत पागे (मध्य प्रदेश, २.०९.२९ से), ३. झेविअर डिसुझा (गोवा, २.११.९४ से); २०० मी बॅकस्ट्रोक मुले (१३-१४ वयोगट)- १. आर्यन भोसल े(महाराष्ट्र, २.११.९७ से), २. वेदांत बाफना (महाराष्ट्र, २.१३.५० से), ३. आकाशदिप सिंग (पंजाब, २.१८.५१से); २००मी मिडले मुली(१५-१७ वयोगट)- १. रेना सलढाणा(महाराष्ट्र, २.२९.८८से), २. तन्वी तांत्री(कर्नाटक, २.३१.७३से), ३. झानती राजेश(कर्नाटक, २.३३.५५से); २००मी मिडले मुली(१३-१४ वयोगट)- १. केनिशा गुप्ता(महाराष्ट्र, २.३१.३४से), २. जान्हवी गोली(तेलंगणा, २.३३.०८से), ३. सिया बिजलानी(महाराष्ट्र, २.३४.४८से); २००मी मिडले मुले(१५-१७ वयोगट)- १. निल रॉय(महाराष्ट्र, २.११.१६से), २. वेदांत खांडेपारकर(महाराष्ट्र, २.१३.५६से), ३.सीवा एस(कर्नाटक, २.१४.४३से); २००मी मिडले मुले(१३-१४ वयोगट)- १. स्वदेश मोंडल(पश्चिम बंगाल, २.१५.२८से), २. आर्यन भोसले(महाराष्ट्र, २.१८.७९से), आर्यन नेहरा(गुजरात, २.२०.३०से); १००मी ब्रेसस्ट्रोक मुली(१५-१७ वयोगट)- १. रिध्दी बोहरा(कर्नाटक, १.१६.६७से), २.सलोनी दलाल(कर्नाटक, १.१६.९०से), ३. आलिया सिंग(उत्तर प्रदेश, १.१८.७९से) १००मी ब्रेसस्ट्रोक मुली(१३-१४ वयोगट)- १.आदिती बालाजी(तामिळनाडू, १.१७.९७से), २. रचना राव(कर्नाटक, १.१९.६५से), ३. शानीया शिरोमणी(कर्नाटक, १.२१.४३से); १००मी ब्रेसस्ट्रोक मुले(१५-१७ वयोगट)- १. दानुश एस(तामिळनाडू, १.०५.८४से), २. मिलांतोन दत्ता(आसाम, १.०८.१७से), ३. मानव दिलिप(कर्नाटक, १.०८.२२से); १००मी ब्रेसस्ट्रोक मुले(१३-१४ वयोगट)- १. स्वदेश मोंडल(पश्चिम बंगाल, १.१०.५०से), २. लिथिश गौडा(कर्नाटक, १.१२.७३से), ३. अभिषेक कुमार(उत्तर प्रदेश, १.१३.२९से); ४१०० मी मिडले मुले(१५-१७ वयोगट)- १. कर्नाटक(श्रीहरी नटराज, अनिरुध्द एच.एम, पृथ्विक डी.एस, राहूल एम, ४.०१.३१से), २. महाराष्ट्र(दिविज टेकवडे, मिहिर आंब्रे, आभिनंदन दळवी, निल रॉय, ४.०३.७२से), ३. तामिळनाडू(कौशिक विक्टो, आदित्य डी, धनुष एस, गोकुळनाथ व्ही.एस, ४.०३.७६)