पुणे : चैन्नई एक्सप्रेसने आलेल्या दाेघा संशयितांकडून एक काेटी पाच लाख रुपयांचे साेने लाेहमार्ग पाेलिसांनी पकडले आहे. शनिवारी 3 ऑगस्टला ही कारवाई करण्यात आली. पाेलिसांनी साेने जप्त केले असून पुढील कारवाई करण्यासाठी ते इन्कम टॅक्स खात्याकडे साेपविण्यात आले आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाेलिसांना गाेपनीय माहितीदाराकडून माहिती मिळाली हाेती की, दाेन इसम चैन्नई एक्सप्रेसने पुण्याला येत असून त्यांच्याकडे अवैध साेने आहे. लाेहमार्ग पाेलिसांनी या माहितीची खात्री केली असता पाेलिसांना दाेन इसम संशयास्पद दिसून आले. पाेलिसांना पाहताच ते लपण्याचा प्रयत्न करु लागले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पाेलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केली. पाेलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 2 किलो 974 ग्रॅम सोने आढळून आले. त्याची किंमत अंदाजे एक काेटी पाच लाख रुपये इतकी आहे. पाेलिसांनी या साेन्याबाबत त्यांच्याकडे चाैकशी केली असता दाेघे उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. तसेच त्यांच्याकडे साेन्याचे कुठलेही बिल किंवा मालकी सिद्ध करणारे कागदपत्र नसल्याने पाेलिसांनी सीआरपीएस 102 अन्वये साेने जप्त केले. तसेच पुढील कारवाईसाठी इन्कम टॅक्स विभागाला कळविण्यात आले. याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे.