पुणो : उदारीकरणाच्या धोरणानंतर सोन्यावरील आयातकर 2 टक्क्यांर्पयत कमी करण्यात आल्याने सोने तस्करीमध्ये फायदा खूपच कमी झाला़ परिणामी सोन्याची तस्करी गेल्या दशकात पूर्णपणो बंद झाली होती़ मात्र, गेल्या 3-4 वर्षात 2 टक्क्यांवर असलेले सीमाशुल्क आता 1क् टक्क्यांवर गेल्याने, पुन्हा एकदा सोनेतस्करी वाढली असून, त्याच्या जोडीला हवाला आणि अमली पदार्थाच्या तस्करीची जोडही त्याला मिळाली आह़े
याबाबत महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे सचिव दत्तात्रय देवकर म्हणाले, की सोनेआयातीवर 2क्क्4-क्5 मध्ये केवळ 2 टक्के कर होता़ बाहेरच्या देशातील दर आणि भारतातील दर यातील फरक कमी झाल्याने फायदा खूपच कमी झाला होता़ त्यामुळे तस्करीमार्गाने येणारे सोने कमी झाले व केंद्र सरकारला देशात येणा:या सर्व आयात सोन्यावर कर मिळू लागला़ (प्रतिनिधी)
4पुण्यात आज 1 कोटीचे सोने घेऊन येणा:या महिलेला सीमाशुल्क विभागाने अटक केली़ गेल्या काही दिवसांमध्ये देशातील विविध शहरांमधील विमानतळावर आयात कर चुकवून सोने आणणा:यांना अटक करून, त्यांच्याकडून तस्करीचे सोने जप्त करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत़ 2क्11 मध्ये पुण्यामध्ये सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवायांमध्ये 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोने जप्त केले होत़े एप्रिल ते सप्टेंबर 2क्14 दरम्यान तस्करीतून 6क्4 किलो सोने भारतात आयात झाले असाव़े