पुणे : अबुधाबीवरून आलेल्या प्रवाशाकडून ४.३७१ किलोचे अठरा कॅरेटचे ९७ लाख रूपयांचे सोने हवाईदलाच्या सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोहगाव विमानतळावर पकडले. सैफुला नासर दुदगावे (रा. कोल्हापूर) याच्याकडे हे सोने सापडले. बुधवारी दुपारी ४ वाजून २५ मिनिटांनी अबुधाबीवरून येणारे जेटएअरवेजचे विमान लोहगाव विमानतळावर पोहोचले. सुरूवातीला तपासयंत्रणेमधून तो सुरक्षितपणे बाहेर पडला. मात्र त्याच्या हालचाली सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशयस्पाद वाटल्याने त्याला चौकशीसाठी थांबविण्यात आले. त्याच्या सामानाची कसून तपासणी केली असता त्यामध्ये धातूच्या वस्तू आढळ्ल्या. शिलाई मशिन आणि इस्त्रीमध्ये त्याने सोने लपवून आणल्याचे आढळले. या सोन्याची किंमत जवळपास ९७ लाख रूपये इतकी आहे. स्मगलिंग केलेले हे सोने जकात चुकविण्याच्या उद्देशाने त्याने आणल्याचे समोर आले आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त भारत नवले यांनी सांगितले.
शिलाई मशिन, इस्त्रीमधून सोन्याची तस्करी!; लोहगाव विमानतळावरून ९७ लाखांचे सोने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 7:18 PM
अबुधाबीवरून आलेल्या प्रवाशाकडून ४.३७१ किलोचे अठरा कॅरेटचे ९७ लाख रूपयांचे सोने हवाईदलाच्या सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोहगाव विमानतळावर पकडले.
ठळक मुद्दे४.३७१ किलोचे अठरा कॅरेटचे ९७ लाख रूपयांचे सोने जप्तजकात चुकविण्याच्या उद्देशाने आणल्याचे समोर आले स्मगलिंग केलेले सोने