शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
4
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
5
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
6
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
7
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
8
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
10
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
11
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
12
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
13
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
14
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
15
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
16
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
17
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
18
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
19
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
20
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र

‘हवेचे प्रदूषण’ प्रकल्पाचा सुवर्णवेध

By admin | Published: February 28, 2016 3:43 AM

नावीन्यपूर्ण; तसेच ज्वलंत विषयांवरील सादरीकरणामुळे येथील विद्याधाम प्रशालेच्या विज्ञान प्रकल्पांना सलग आठ वर्षे राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळू शकले आहे. २०१४ मध्ये

शिरूर : नावीन्यपूर्ण; तसेच ज्वलंत विषयांवरील सादरीकरणामुळे येथील विद्याधाम प्रशालेच्या विज्ञान प्रकल्पांना सलग आठ वर्षे राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळू शकले आहे. २०१४ मध्ये सादर केलेल्या ‘रांजणगाव एमआयडीसीतील हवेचे प्रदूषण, हवेच्या प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम’ या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळाले. विद्यार्थ्यांना वैयक्तिरीत्या गौरविण्यातही आले. या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येणारी वैज्ञानिक प्रगल्भता भविष्यात देशाच्या कामी आल्यास आश्चर्य वाटायला नको. विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी २००६ पासून ‘राष्ट्रीय बालविज्ञान परिषदे’च्या वतीने आयोजित प्रकल्प स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर आपले नाव उमटविण्यास प्रारंभ केला. ‘दुर्लक्षित खाद्य वनस्पती’ या विषयावर त्यांनी सिक्कीम येथे प्रकल्प सादर केला. यानंतर गहू या पिकाच्या जैवविविधता (२००७), शिरूर परिसरातील सेंद्रिय व रासायनिक शेती (२००८), शिरूर परिसरातील माती (२०१०), विविध धातूंच्या भांड्यात अन्न शिजवण्यासाठी लागणारी ऊर्जा (२०१२) या विषयांवरील वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळे या प्रकल्पांना राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळाले. २०१४ मध्ये विद्यार्थ्यांनी केलेला ‘रांजणगाव एमआयडीसीतील हवेच्या प्रदूषणामुळे वातावरणावर होणारा परिणाम’ हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर गेला. या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांनी चार महिने कष्ट घेतले. एमआयडीसीतील कारखान्यांचा सर्व्हे केला. अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या वायूचे प्रमाण शोधले. प्रत्यक्ष प्रयोग करून हवेतील घटकांचे मोजमाप केले. याबाबत अभ्यास करून निरीक्षणे नोंदवली. एमआयडीसीतील उपलब्ध करून दिलेल्या उपकरणाच्या साह्याने कार्बन मोनाक्साइड, डायआॅक्साइड, पार्टिकल्स आदींची मोजणी केली. त्याचा अभ्यास केला. कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या वायूमुळे सभोवताली पिकांवर होणारा परिणाम, नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम याचाही विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. यात पिकांवर परिणाम झाल्याचे दिसून आले. उत्पादनावर परिणाम झाल्याचेही दिसून झाले. नागरिकांना श्वसनाचे व हृदयविषयक विकार असल्याचेही विद्यार्थ्यांना जाणवले. (वार्ताहर)विविध निष्कर्ष नोंदवलेहवेच्या प्रदूषणामुळे शेती प्रभावीत झाल्याचे व नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचा ़िनष्कर्ष विद्यार्थ्यांनी निरीक्षणाद्वारे नोंदविले. अर्थात, यात तथ्यही आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही याची निरीक्षणे आहेतच. या प्रकल्पाला सुवर्णपदक मिळाले, हे गौरवास्पद आहे. मात्र, प्रकल्पाद्वारे जे निष्कर्ष समोर आले, त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने तसेच शासनाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, एवढे मात्र नक्की; अन्यथा प्रकल्प व निष्कर्ष हे सादरीकरणापुरतेच मर्यादित राहतील.