पुणे : धीरोत्तर वृत्तीने एखादे काम कसे करावे, याचा आदर्श भारवि खरे यांनी घालून दिला. भारविंनी केलेल्या कामाचा आवाका आणि बदललेले चांगले स्वरूप यांमुळे उत्तम साहित्य वाचकांसमोर आले. त्यांच्यासारखे लोक आपापल्या क्षेत्रात चांगले काम करीत असल्यामुळेच देशात चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरिजी यांनी व्यक्त केले. भारवि या नावातच प्रतिभा व प्रज्ञा असलेले, संतचरित्रांच्या व विचारांच्या लेखनातून संतांच्या साहित्य व सहवासात रमलेले भारवि खरे यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन भारवि खरे अमृत महोत्सव समितीतर्फे करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे, उमाकांत कुलकर्णी, भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले, उमाकांत कुलकर्णी, समितीचे अध्यक्ष अॅड. रा. ना. कलभंडे, उदय जोशी, प्रतिमा नाफळे, राहुल मारुलकर, मिलिंद देसाई आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात भारवि खरे यांचा विशेष सन्मान आणि त्यांची तुला करण्यात आली. संतकृपा मासिक विशेषांक, ओंजळीतील फुले आणि उत्तरायण या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. मिलिंद देसाई यांनी सूत्रसंचालन केले.
चांगल्या कामामुळेच ‘अच्छे दिन’
By admin | Published: March 21, 2017 5:30 AM