शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
2
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
3
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
4
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
5
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
6
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
7
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
8
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
9
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
10
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
11
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
12
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
13
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
14
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
15
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
16
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
17
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
18
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
19
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
20
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच

बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 12:24 PM

१८ मेपर्यंत अवकाळीचे वातावरण कायम असून, रविवार, १९ मेपासून अवकाळीचा जोरही कदाचित कमी होण्याची शक्यता

पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) रविवारी (दि. १९) अंदमानात दाखल होणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच, राज्यातील अवकाळी पाऊस १९ नंतर ओसरेल, असाही अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार आहे.

दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनच्या हालचाली दिसून येत आहेत. दरवर्षी मान्सून अंदमानात १९ मेच्या आसपास दाखल झालेला पाहायला मिळतो. दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर समुद्र सपाटीपासून १ ते १.५ किलोमीटर उंचीवर नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह आणि पावसाच्या हजेरीने मान्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करण्यात येते. पुढील दोन ते तीन दिवसांत अंदमान - निकोबार बेट समूह आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून प्रगती करण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मान्सून साधारणत: २१ मेपर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोहोचतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो. यंदा मान्सून रविवारी (दि. १९) अंदमानात दाखल होणार आहे.

मान्सूनचे अंदमानातील आगमन

वर्ष--- मान्सून आगमन

२०१८--- २५ मे२०१९--- १८ मे२०२०--- १७ मे२०२१--- २१ मे२०२२--- १६ मे२०२३--- १९ मे२०२४--- १९ मे

शनिवार, दि. १९ मे दरम्यान, नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) देशाच्या महासागरीय क्षेत्रात म्हणजे बंगालच्या उपसागरात, इंडोनेशियाच्या पश्चिम किनारपट्टी तसेच सुमात्रा बेटापर्यंत दस्तक देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १ जून या सरासरी तारखेला देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळ राज्याच्या टोकावर हजेरी लावणारा दक्षिण - पश्चिम मान्सून बंगालच्या उपसागरात प्रत्यक्षात कशी वाटचाल करतो, यावरच एक जून या तारखेची निश्चिती ठरवली जाईल. म्हणजेच अजून तीन आठवड्यांचा कालावधी लोटायचा आहे. शनिवार, १८ मेपर्यंत अवकाळीचे वातावरण कायम असून, रविवार, १९ मेपासून अवकाळीचा जोरही कदाचित कमी होऊ शकतो. -माणिकराव खुळे, आयएमडीचे माजी प्रमुख

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसTemperatureतापमानenvironmentपर्यावरणSocialसामाजिकFarmerशेतकरीmonsoonमोसमी पाऊस