पुणे : खडकवासला धरण साखळी प्रकल्पांतील चारही धरणांत आतापर्यंत १५. १६टीएमसी म्हणजे, ५२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५.०१ टीएमसीने म्हणजे, १७.१९ टक्के पाणीसाठा कमी आहे.
राज्यात जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली. जुलै महिना निम्मा संपत आला. गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली आहे. २३ जुलै रोजी सकाळी ६वाजे पर्यंत या चारही धरणांत १५. १६टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता. गेल्या वर्षी याच दिवशी चारही धरणांत मिळून एकूण २०. १७ टीएमसी म्हणजे, ६९.१९टक्के पाणीसाठा होता.
धरणांतील सद्य:स्थिती
धरण टीएमसी टक्केखडकवासला १.२७ ६४.१०पानशेत ५.९३ ५५.६६वरसगाव ६.६६ ५१. ९४टेमघर १.३१ ३५. ३२
एकूण १५.१६ ५२.००