पुणे : भीषण दुष्काळाचे चटके बसत असताना यंदाचा मान्सून समाधानकारक असेल, अशी खूशखबर हवामान शास्त्र विभागाने सोमवारी दिली. पावसाळ्याच्या चार महिन्यांत देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज आहे.त्यात त्यांनी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज दिला आहे़ या अंदाजामध्ये ५ टक्के कमी-अधिक फरक गृहित धरला आहे़ ‘एल निनो’विषयी काही दिवस खूप चर्चा आहे़ सध्या तो कमजोर पडला असून, त्याची स्थिती मान्सूनच्या काळात आणखी कमजोर होण्याची शक्यता आहे़ हिंदी महासागरातील स्थिती स्थिर असून, मान्सूनच्या काळात ती अनुकूल होण्याची शक्यता आहे़ हा अंदाज वर्तविताना प्रशांत महासागरातील डिसेंबर, जानेवारीचे तापमान, दक्षिण भारतीय महासागरातील समुद्राचे फेब्रुवारीतील तापमान, पूर्व आशिया सागरी स्तरावरील फेब्रुवारी-मार्चचा दबाव आदी प्रमुख पाच घटकांचा विचार करण्यात आला आहे.>असा आहे अंदाजसरासरीच्या ९० टक्क्यांहून कमी १७ टक्के शक्यतासरासरीपेक्षा कमी पण ९० ते ९६ टक्के ३२ टक्के शक्यतासरासरी एवढा ९६ ते १०४ टक्के ३९ टक्के शक्यतासरासरीपेक्षा अधिक १०४ ते ११० टक्के १० टक्के शक्यताखूप जास्त ११० टक्क्यांपेक्षा अधिक २ टक्के शक्यता
खूशखबर ! यंदा मान्सून समाधानकारक; ९६ टक्के पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 6:33 AM