पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे हिवाळा व नाताळनिमित्त होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीमुळे पुणे-मंगळुरू मार्गावर २६ डिसेंबर ते ३ जानेवारी चार विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे स्थानकाहून २६ डिसेंबर व २ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी मंगळुरूसाठी विशेष गाडी प्रस्थान करणार आहेत. दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी मंगळुरू येथे पोहचणार असून तेथून २७ डिसेंबर व ३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी पुण्याकडे प्रस्थान करणार आहेत. या गाड्या दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी पुण्यात पोहचणार आहेत. या गाड्या लोणावळा, पनवेल, रोहा, खेड, चिपळून, रत्नागिरी, कणकवली, कुडाल, थिविम, मडगाव, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उड्डपी आणि मुल्की या रेल्वे स्थानकावर थांबणार आहेत.
मंगळुरूच्या प्रवाशांसाठी खुषखबर!; हिवाळा अन् नाताळनिमित्त चार विशेष रेल्वे गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:31 PM
पुणे-मंगळुरू मार्गावर हिवाळा व नाताळनिमित्त मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने २६ डिसेंबर ते ३ जानेवारी चार विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्दे२६ डिसेंबर ते ३ जानेवारी चार विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णयमध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे हिवाळा व नाताळनिमित्त विशेष रेल्वे गाड्या