पुणे : लोकलमागे धावणाऱ्या मुंबईकरांप्रमाणेच पुण्यात पुणेकर पीएमपी मागे धावताना दिसतात. पीएमपी ही पुणेकरांची स्पीरीट वाहिनी ठरत आहे. शिक्षणाची पंढरी असलेल्या पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी हिच्या आठवणी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. आता पुणेकरांसाठी पीएमपीने गुडन्यूज दिली आहे. पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) शहरात पीएमपीच्या बसमधून फिरण्यासाठीचा दैनिक पास आता अवघ्या 50 रुपयांत उपलब्ध होणार आहे.
पुणे शहरात दिवसभर फिरायचे असल्यास दैनिक पास 40 रुपयांना मिळणार असून त्याच, धर्तीवर पिंपरी चिंचवडमध्ये फिरण्यासाठीही अवघ्या 40 रुपयांत दैनिक पास मिळणार आहे. पीएमपीच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाने गुरुवारी फेटाळला. त्यामुळे, महागाईपासून थोडासा दिलासा पुणेकरांना मिळाला आहे.
'प्रवाशांना दिलासा देण्यासाठी पीएमपीच्या दैनंदिन पासचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढेल, असा अंदाज आहे. पीएमपीच्या ताफ्यात नव्या बस दाखल होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील.', असे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पीएमपीचा दैनंदिन प्रवासाचा पास सध्या 70 रुपयांना आहे. त्याची किंमत कमी करण्यात आली आहे. त्यानुसार आता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांत फिरायचे असल्याचे प्रवाशांना 50 रुपयांना पास मिळणार आहे. त्यासाठीचा मासिक पास 1200 रुपयांना मिळेल. तर फक्त पुणे किंवा पिंपरी चिंचवड शहरात फिरायचे असल्यास 40 रुपयांत दिवसाचा पास मिळेल.