पुणे : देशातील स्पाइसजेट या विमान कंपनीने देशांतर्गत ६६ विमान उड्डाणे सुरु केल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या विमानसेवेचा थेट पुणेकरांनाही आनंद घेता येणार आहे. दरभंगा, दुर्गापूर, जबलपूर, वाराणसी, ग्वाल्हेर या पाच शहरांसाठी विमानसेवेची नवीन उड्डाणे २८ मार्चपासून सुरू होतील.
छोट्या शहरांमधून वाढत्या विमान प्रवासाच्या मागणीला पाठबळ देण्यासाठी आणि मेट्रो शहरे एकमेकांना जोडण्यासाठी नवीन उड्डाणे सुरू केली आहेत. यापूर्वी दरभंगाला मुंबई, दिल्ली आणि बेंगलोरशी जोडल्यानंतर पुणे, हैद्राबाद आणि कोलकाता या ठिकाणी नवीन उड्डाणे सुरू होणार आहेत. तसेच पुणे ही दुर्गापूर, ग्वाल्हेर, जबलपूर आणि वाराणसीला जोडणारी विमानसेवा प्रथमच होणार आहे. ही नवीन उड्डाणे २८ मार्च २०२१ पासून सुरू होणार आहेत.
या व्यतिरिक्त अहमदनगर, अहमदाबाद, श्रीनगर, कोलकाता, मुंबई, लेह, सुरत, कोची, जबलपूर या शहरांना यांना जोडणारी नवी उड्डाणे सुरू केली आहेत. असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
स्पाइसजेटकडून 66 नवीन देशांतर्गत उड्डाणे.सुरु... पुणे - दरभंगा, पुणे-दुर्गापूर, पुणे-ग्वाल्हेर, पुणे-जबलपूर, पुणे-वाराणसी, कोलकाता-दरभंगा, चेन्नई-झारसुगुडा आणि नाशिक - कोलकाता या मार्गांवर थेट विमानसेवा पहिलाच प्रयत्न आहे. दरभंगाला अहमदाबाद, हैदराबाद, पुणे, कोलकाता, झारसुगुडा, चेन्नई, दुर्गापूर आणि ग्वाल्हेर यांना पुण्याला जोडणारी नवीन उड्डाणे घेणार आहे. श्रीनगरला अहमदाबाद, बेंगळूरु आणि कोलकाता या महानगरांसह जोडण्यासाठी दिल्ली-गोरखपूर, मुंबई-राजकोट, चेन्नई-मदुरै, मुंबई-गोवा, दिल्ली-श्रीनगर, दिल्ली-धर्मशाला अशा अनेक मार्गांवर वारंवारता वाढवते. 28 मार्च 2021 पासून नवीन उड्डाणे सुरु केली आहे.
पुणे-दरभंगा, पुणे-दुर्गापूर, पुणे-ग्वाल्हेर, पुणे-जबलपूर, पुणे-वाराणसी, कोलकाता-दरभंगा, चेन्नई-झारसुगुडा आणि नाशिक-कोलकाता या क्षेत्रांवर दररोज थेट विमानसेवा सुरू करणारी स्पाइसजेट ही पहिली भारतीय विमान कंपनी आहे. नाशिकला दिल्ली, हैदराबाद आणि बेंगळुरूशी जोडल्यानंतर आता स्पाइसजेट शहरालाही कोलकाताशी जोडले जाणार आहे.