वनाज ते गरवारे महाविद्यालय या ५ किलोमीटरच्या मेट्रो मार्गाची चाचणी येत्या महिनाभरात होईल. त्यासाठी मेट्रोच्या तीन डब्यांच्या दोन गाड्या वनाज डेपोत डेरेदाखल झाल्या आहेत. या मार्गावरच्या वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप व गरवारे महाविद्यालय या ५ स्थानकांच्या कामालाही त्यामुळे गती देण्यात आली आहे.पिंपरी चिंचवड मेट्रो मार्गांच्या तुलनेत बरेच मागे पडलेले वनाज ते गरवारे महाविद्यालय या प्राधान्य मार्गांचे काम आता महामेट्रोने जवळपास पुर्ण करत आणले आहे. विद्यूत खांब, संगणकीय दिशादर्शक दिवे ही कामे आता अंतीम टप्यात आहेत. त्यामुळेच डब्यांची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे दोन गाड्यांचे प्रत्येकी ३ असे सहा डबे वनाज येथील डेपोत पोहचले आहेत. नागपूर मेट्रोसाठीचे हे डबे आहेत. पुण्यात ते फक्त चाचणीसाठी म्हणून वापरण्यात येतील. पुण्यातील दोन्ही मार्गांवरील मेट्रोचे डबे इटली येथील कारखान्यातून येणार असून ते सर्व डबे विशेष प्रकारच्या हलक्या पण कडक अशा धातूपासून तयार.केलेले असतील.चाचणीपुर्व तयारीला साधारण महिना लागेल. ऊन्नत मार्गावरील काही किरकोळ पण मेट्रो धावण्यासाठी महत्वाची असलेली कामे सध्या सुरू आहेत. ती त्वरीत पुर्ण करण्याबाबत ठेकेदार कंपनीला कळवण्यात आले आहे. या मार्गावरील सर्व स्थानकांपैकी गरवारे महाविद्यालय, आयडीयल कॉलनी, आनंदनगर या स्थानकांचे काम आता ६० टक्के झाले आहे. छत व अन्य कामेही तातडीने, जास्तीचे मजूर लावून.करण्यात येत आहेत अशी माहिती जनसंपर्क विभागाचे संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली.याच मार्गावर सोनल हॉल ते एस एन डीटी महाविद्यालय हा सुमारे ३५० मीटर लांबीचा पुण्यातील पहिला दुहेरी पूल तयार होतो आहे.. मेट्रोच्या खांबाला जोडूनच तो असेल. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन असा हा चारपदरी (साधारण १४ मीटर रूंद) असेल. त्याचेही काम सुरू करण्यात आले आहे. पूल तयार झाला की वरून मेट्रो त्याखाली हा पूल व पुलाखाली रस्ता असे द्रुश्य नळस्टॉप चौकात दिसेल. यातून नळस्टॉप चौकात रोज होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.वनाज ते गरवारे, मेट्रोची महिनाभरात होणार चाचणीनागपूरातून सहा डबे दाखल: पाच स्थानकांचे कामही गतीनेलोकमत न्यूज नैटवर्कपुणे: वनाज ते गरवारे महाविद्यालय या ५ किलोमीटरच्या मेट्रो मार्गाची चाचणी येत्या महिनाभरात होईल. त्यासाठी मेट्रोच्या तीन डब्यांच्या दोन गाड्या वनाज डेपोत डेरेदाखल झाल्या आहेत. या मार्गावरच्या वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप व गरवारे महाविद्यालय या ५ स्थानकांच्या कामालाही त्यामुळे गती देण्यात आली आहे.पिंपरी चिंचवड मेट्रो मार्गांच्या तुलनेत बरेच मागे पडलेले वनाज ते गरवारे महाविद्यालय या प्राधान्य मार्गांचे काम आता महामेट्रोने जवळपास पुर्ण करत आणले आहे. विद्यूत खांब, संगणकीय दिशादर्शक दिवे ही कामे आता अंतीम टप्यात आहेत. त्यामुळेच डब्यांची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे दोन गाड्यांचे प्रत्येकी ३ असे सहा डबे वनाज येथील डेपोत पोहचले आहेत. नागपूर मेट्रोसाठीचे हे डबे आहेत. पुण्यात ते फक्त चाचणीसाठी म्हणून वापरण्यात येतील. पुण्यातील दोन्ही मार्गांवरील मेट्रोचे डबे इटली येथील कारखान्यातून येणार असून ते सर्व डबे विशेष प्रकारच्या हलक्या पण कडक अशा धातूपासून तयार.केलेले असतील.चाचणीपुर्व तयारीला साधारण महिना लागेल. ऊन्नत मार्गावरील काही किरकोळ पण मेट्रो धावण्यासाठी महत्वाची असलेली कामे सध्या सुरू आहेत. ती त्वरीत पुर्ण करण्याबाबत ठेकेदार कंपनीला कळवण्यात आले आहे. या मार्गावरील सर्व स्थानकांपैकी गरवारे महाविद्यालय, आयडीयल कॉलनी, आनंदनगर या स्थानकांचे काम आता ६० टक्के झाले आहे. छत व अन्य कामेही तातडीने, जास्तीचे मजूर लावून.करण्यात येत आहेत अशी माहिती जनसंपर्क विभागाचे संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली.याच मार्गावर सोनल हॉल ते एस एन डीटी महाविद्यालय हा सुमारे ३५० मीटर लांबीचा पुण्यातील पहिला दुहेरी पूल तयार होतो आहे.. मेट्रोच्या खांबाला जोडूनच तो असेल. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन असा हा चारपदरी (साधारण १४ मीटर रूंद) असेल. त्याचेही काम सुरू करण्यात आले आहे. पूल तयार झाला की वरून मेट्रो त्याखाली हा पूल व पुलाखाली रस्ता असे द्रुश्य नळस्टॉप चौकात दिसेल. यातून नळस्टॉप चौकात रोज होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.