पुणे : गोठवलेले बँक खाते पुन्हा सुरू करून क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वस्तू व सेवा कर कार्यालयातील करनिरीक्षकाला रंगेहाथ पकडले.
ज्योत्स्ना रामचंद्र कोरडे (वय ३५) असे या राज्य कर निरीक्षकाचे नाव आहे. वस्तू व सेवा कर कार्यालयाने सापळा एका तक्रारदाराचे बँक खाते गोठविले आहे. हे गोठवलेले बँक खाते पुन्हा सुरू करून क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्यासाठी ज्योत्स्ना कोरडे यांनी तक्रारदाराकडे २ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाल्यानंतर आज पडताळणी करण्यात आली.
त्यानंतर येरवडा येथील वस्तू व सेवा कर कार्यालयात रचण्यात आला. तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच घेताना ज्योत्स्ना कोरडे यांना पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक ज्योती पाटील अधिक तपास करीत आहेत.