शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

गोपीचंद पडळकर तालुक्याचे नेते नसून त्यांचा संपूर्ण राज्यात प्रवास - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 1:54 PM

'गोपीचंद पडळकर हे एका तालुक्याचे नेते नाहीत...'

पुणे: आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील (rohit patil) यांच्यामुळे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली होती. तर दुसरीकडे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आणि अजित पवार (ajit pawar) यांच्यावर टीका करून लक्ष वेधून घेणारे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांच्या गावच्या निवडणुकीकडेही अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र पडळकर यांच्या खानापूर नगरपंचायतीवर भाजपला भोपळाही फोडता आला नाही. मात्र असं असलं तरीही भाजपा पडळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचं स्पष्ट आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात भाजपचा पराभव झाल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, गोपीचंद पडळकर हे एका तालुक्याचे नेते नाही. संपूर्ण राज्यभर त्यांचा प्रवास सुरु आहे. पडळकर यांच्या खानापूर आटपाडी मध्ये निवडणुका लागू द्या, मग बघूया, तो त्यांचा खरा बालेकिल्ला आहे. खानापूर-आटपाडी मिळून तो मतदार संघ तयार होतो. पंढरपूर येथे झालेल्या पोटनिवडणुकीत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवून दिला. अनेक दिवस ते या मतदारसंघात ठाण मांडून बसले होते, अशी चंद्रकांत पाटील यांनी पडळकर यांची पाठराखण केली.

गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात झालेल्या खानापूर नगरपंचायतीत शिवसेना काँग्रेसला 9 तर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित जनता आघाडीला 7 जागा मिळाल्या. तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला. मात्र याठिकाणी भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे ज्या नगरपंचायतची जबाबदारी गोपीचंद पडळकर यांच्या खांद्यावर भाजपने दिली होती, तिथे पराभव पत्करावा लागल्यामुळे विरोधकांनी पडळकर यांच्यावर टीका केली होती.

टॅग्स :PuneपुणेGopichand Padalkarगोपीचंद पडळकरSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटील