पुणे: एसटी पुन्हा सुरू झाली पाहिजे. चर्चेच्या माध्यमातून एसटी कर्मचारी आणि राज्य सरकार यातून नकीच मार्ग काढतील. गोपीचंद पडळकर (gopichand padalkar), सदाभाऊ खोत (sadabhau khot) या आंदोलनात तेल टाकण्याचं काम करत आहेत, असा आरोप राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी केेला आहे. यापूर्वी भाजपचं सरकार होतं तेव्हा सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या का मान्य केल्या नाहीत, असाही प्रश्न सत्तार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला आहे.
औरंगाबादचे नामकरण लवकरच संभाजीनगर होणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले. चंद्रकांत दादा जेष्ठ नेते आहेत त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही मात्र ते देव पाण्यात घालून बसले आहेत. त्यांना वाटतं की कधी तरी सरकार पडेल आणि बाबळीचा झाड खाली बसलात ते आंब्याच्या झाडाखाली बसतील पण असं काही होणार नाही हे सरकार 5 वर्ष टिेकेल, असा विश्वासही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, दंगल घडवणारे जे कोण अपराधी असतील ते रझा अकादमीचे असो की भाजपच्या पुरस्कृत काही संघटना असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.