पिंंपरी : भारतीय जनता पक्षाने मंत्रिमंडळात संधी देण्याचे आश्वासन दिले होते, मंत्रिमंडळ विस्तारावेळी दखल घेतली जाईल, असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनुकूल चर्चा केली होती. मात्र, अद्याप दखल घेतलेली नाही, अशी खंत रिपब्लिकन पक्षाचे नेते, खासदार रामदास आठवले यांनी चिंचवड येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.आठवले म्हणाले, ‘‘पद नाही मिळाले, म्हणून आघाडीतून बाहेर पडणार, असेही काही नाही. समाजाची कामे करण्यासाठी भाजपा सरकारबरोबर राहण्यातच हित आहे. पक्षाच्या समन्वय समितीची बैठक आहे. त्या समन्वय समितीत घटक पक्षांनाही विचारात घ्यावे, अशी आमची मागणी आहे. ’’ (वार्ताहर)लोणावळ्यातील हॉटेलात बालिकेचा खून झाला. या घटनेच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांच्याकडून हॉटेलचे नुकसान झाले. त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल केले आहेत. हे चुकीचे असून, दरोड्याचे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. - रामदास आठवले, खासदार
आश्वासन मिळाले, संधी कधी!
By admin | Published: February 21, 2015 12:31 AM