शासनाकडून यादीत बदल; पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या ऐवजी राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 02:30 PM2023-08-11T14:30:05+5:302023-08-11T14:31:28+5:30

चंद्रकांत पाटील रायगडमध्ये तर अजित पवार कोल्हापुरात ध्वजारोहण करणार

Government announces new list Flag Hoisting by Governor instead of Chandrakant Patal in Pune | शासनाकडून यादीत बदल; पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या ऐवजी राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

शासनाकडून यादीत बदल; पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या ऐवजी राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

googlenewsNext

पुणे : स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण जिल्हा मुख्यालयात कोण करणार, याची यादी जाहीर करण्यात आली होती. पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव जाहीर झाले होते.  परंतु शासनाने यादीत एक बदल केला असून नवीन यादी जाहीर केली आहे. पुण्यात राज्यपाल रमेश बैस ध्वजारोहण करणार असून चंद्रकांत पाटील रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापुरात ध्वजारोहण होणार असल्याचे यादीत नमूद करण्यात आले आहे. 

दिलीप वळसे पाटील - वाशिम, हसन मुश्रीफ -सोलापूर, धनंजय मुंडे - बीड, छगन भुजबळ - अमरावती, अनिल पाटील - बुलढाणा, आदिती तटकरे - पालघर, धर्मराव आत्राम - गडचिरोली, संजय बनसोडे - लातूर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येणार आहे. शिवसेना व भाजपच्या मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक जिल्ह्यांची जबाबदारी होती. ती आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडे पालकमंत्री म्हणून दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी ध्वजवंदनाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Web Title: Government announces new list Flag Hoisting by Governor instead of Chandrakant Patal in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.