पुणे : ब्रह्माकुमारी एज्युकेशनल सोसायटी संस्थेला ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन एक्सलन्स-१५ चा राज्य शासनाचा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. स्वयंसेवी संस्था गटात सन २०१९-२० साठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ऊर्जा संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्थांना व व्यक्तींना गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणतर्फे उर्जा सरंक्षण पुरस्कार देण्यात येतो.
ब्रह्माकुमारी एज्युकेशनल सोसायटीने पर्यावरण संरक्षण अभियानातंर्गत नैसर्गिक साधनसंपत्ती, इंधन, पाणी, उर्जेचे बचत यासाठी उपक्रम सुरु केला. उर्जा मंत्रालयाद्वारे ब्रह्मा कुमारी सुनंदा यांचा सम्मान लवकरच केला जाणार आहे. राज्य पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल महाऊर्जाचे महाव्यवस्थापक (ऊर्जा संवर्धन) हर्षल भास्करे, ऊर्जा ऑडिटर केदार खमितकर, ब्रह्मा कुमारी विद्यालयाचे सीए ललित इनानी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.