पौड : मुळशीतील पत्रकारांनी तालुका पातळीवरील पहिले पत्रकार भवन बांधून राज्यामध्ये आदर्श निर्माण केला आहे’, असे गौरवोदगार पालकमंत्री गिरीश बापट यांनी काढले. मुळशी पत्रकार संघाच्या वतीने पौड येथे सर्व सोयीयुक्त पत्रकार भवनाचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार महादेव जानकर, संग्राम थोपटे, पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका रजनी इंदुलकर, माजी आमदार शरद ढमाले, राज्य पत्रकार हल्ला कृती समितीचे अध्यक्ष एस. एम. देशमुख, जिल्हाध्यक्ष शरद पाबळे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा संघटक श्रीकांत कदम, पंचायत समितीच्या उपसभापती सविता पवळे, सदस्या उज्जवला पिंगळे व सारिका मांडेकर, चंदा केदारी, सचिन सदावर्ते, लक्ष्मीबाई सातपुते, गणेश सातपुते, अशोक येनपुरे, अशोक साठे आदी उपस्थित होते. या पत्रकार भवनात सुसज्ज ग्रंथालय, पत्रकार कक्ष तयार करण्यात आला असून त्याचेही उदघाटन यावेळी करण्यात आले. यादरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, गटनेते शांताराम इंगवले, सभापती रवींद्र कंधारे, माजी सभापती पांडुरंग राऊत, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप हुलावळे यांनी भेट दिली. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र मारणे व जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय सुर्वे यांनी पत्रकार संघ स्थापनेचा इतिहास व पत्रकार भवन बांधण्याची माहिती सांगितली. पत्रकार भवन बांधण्यासाठी ज्या देणगीदारांनी मदत केली त्या सर्व उपस्थित देणगीदारांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. किसन बाणेकर, महादेव पवार, महेश मालुसरे, सचिन विटकर, बापू घावरे, नीलेश शेंडे, संजय दुधाणे, दत्ता उभे, सागर शितोळे, किशोर देशमुख, बबन मिंडे, मकरंद ढमाले, ज्ञानेश ढाकूळ यांनी स्वागत तर रमेश ससार, प्रदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रामदास दातार यांनी आभार मानले. (वार्ताहर)
पत्रकारांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सरकार कटिबद्ध
By admin | Published: May 28, 2015 11:22 PM