शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

शेतक-यांबाबत सरकार दुटप्पी - रघुनाथ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 6:32 AM

शेतकरी आठवडेबाजार अनधिकृत ठरवून शासनाच्या शेतकरीविरोधी भूमिकेला महापालिका पाठिंबा देत आहे. आठवडेबाजार ही संकल्पना बंद करून शेतकºयांच्या मुलांचा रोजगार बंद करण्याचा घाट घातला जात आहे.

बाणेर -  शेतकरी आठवडेबाजार अनधिकृत ठरवून शासनाच्या शेतकरीविरोधी भूमिकेला महापालिका पाठिंबा देत आहे. आठवडेबाजार ही संकल्पना बंद करून शेतकºयांच्या मुलांचा रोजगार बंद करण्याचा घाट घातला जात आहे. एकीकडे मुख्यमंत्री शेतकºयांच्या पोरांनी नोकरीकडे न वळता, व्यवसाय करण्याची भाषा करतात आणि पणन विभाग शेतकºयांच्या आठवडेबाजाराला वेळेवर परवानगी देत नाही, हे दुट्टपी धोरण शेतकरीविरोधी आहे, अशी टीका शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी केली.बालेवाडी येथे पालिकेच्या रिकाम्या जागेत ३ वर्षे सुरू असलेला शेतकरी बाजार बंद करण्यासाठी नोटीस देऊन अतिक्रमण कारवाई करण्यात आली होती. कारवाईच्या विरोधात आज (दि. ८) शेतकरी संघटना, शेतकरी गट व नागरिक रस्त्यावर उतरले होते. बालेवाडी येथील दसरा चौकात कारवाईसाठी आलेल्या प्रशासनाच्या कर्मचाºयांना विरोध दर्शवण्यात आला. यानंतर विविध शेतकरी गटांच्या शेतकºयांनी आपला माल रस्त्याच्या कडेला मांडून भाजीबाजार भरवला. या प्रसंगी रघुनाथ पाटील या ठिकाणी आले होते.बालेवाडी येथील पालिकेच्या रिकाम्या जागेत चालू असलेल्या गुरुवारच्या शेतकरी बाजाराला ५ मार्च रोजी पालिकेने कारवाईची नोटीस दिली होती. याविरोधात शेतकºयांनी शासनाच्या आठवडेबाजारानुसार परवानगी मागीतली असल्याचे सांगितले; परंतु शासन विलंब करीत आहे, ही बाब निदर्शनास आणून दिली.बालेवाडी येथील ४० सोसायट्यांमधील नागरिकांनी आठवडेबाजार सुरू ठेवण्यासाठी लेखी पाठिंबा दिला आहे. बालेवाडी गावठाण व लक्ष्मीमाता मंदिर परिसरातील सोसायट्या यांना जवळ असणारा हा आठवडेबाजार आहे. या आठवडेबाजारात थेट शेतकºयांकडून ग्राहकांकडे भाजी, फळभाज्या विक्रीसाठी येतात. ३ वर्षे सुरू असलेला बाजार अचानक बंद करण्यामागे स्थानिक राजकारण असल्याचे बोलले जात आहे.काही दिवसांपूर्वी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त याच परिसरात आणखी एक आठवडेबाजार सुरू झाला आहे. यामुळे बालेवाडी गावाजवळील जुना आठवडेबाजार बंद करण्यासाठी कारवाई होत असल्याचे सांगण्यात येत आहे.पुण्यात ४८ शेतकरी बाजार सुरू आहेत. आठवड्यातून काही तास भाजीविक्री करण्यात येते. शासनाच्या जून २०१४ च्या संकल्पनेनुसार पणन विभागाच्या सूचना पाळून आठवडेबाजारात शेतकरी भाजीपाला विक्री करतात; परंतु पालिका अधिकारी अनधिकृत विक्रेत्यांच्यावर कारवाई न करता आठवडेबाजार बंद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. - नरेंद्र पवार, स्वामीसमर्थ शेतकरी गट१ पाटील म्हणाले की, शेतकरी जगवण्यासाठी शासन खरंच धोरण राबवत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन अपयशी ठरत आहे. शेतकºयांच्या मागण्या पूर्ण होत नाही. यातून शेतकरी आपला माल शहरात घेऊन आला, तर त्याला तो विकला जाऊ देत नाही. शेतकरी आठवडेबाजारात अफू, मटका, गांज्याची विक्री होत नाही. मग, हे बाजार अनधिकृत का ? ठरवले जात आहे. मुख्यमंत्री विधानसभेच्या आवारात आठवडेबाजार भरवत असतील, तर पुण्यात मोकळ्या जागेत भरवले जाणारे अठवडेबाजार अनधिकृत कशासाठी ठरवले जात आहेत. शहरातील व्यापरी व अनधिकृत विक्रेते यांच्याशी हातमिळवणी करून पालिका अधिकारी कारवाईचा घाट घालत आहे.२ आठवडे बाजार संयोजक लहू बालवडकर म्हणाले की, तीन वर्षे शेतकरी आठवडेबाजार वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा रितीने पालिकेच्या मोकळ्या जागेत सुरू आहे. शेतकºयांना व्यापारी ठरवून शेतकºयाचा माल ग्राहकांना मिळू नये यासाठी पालिकेचे काही अधिकारी हाताशी धरून कारवाई केली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी