शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

सरकारला यशवंत कारखाना सुरूच करायचा नाही - आढळराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 3:45 AM

यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्याबाबत भाजपा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यांना कारखाना सुरूच करायचा नाही, असा आरोप खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केला.

मांजरी : यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्याबाबत भाजपा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यांना कारखाना सुरूच करायचा नाही, असा आरोप खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केला.हडपसर-मांजरी येथील विकासकामांची पाहणी करण्यासाठी ते आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते. माजी नगरसेवक तानाजी लोणकर, विजय देशमुख, शहर उपप्रमुख समीर तुपे, दिलीप कवडे, अमित घुले, शंकर घुले, सूरज घुले आदी उपस्थित होते. मांजरी बुद्रुक येथील रेल्वे उड्डाणपूल तयार करण्यासाठी ५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.दीड ते दोन महिन्यांत कामाला सुरुवात होईल. महादेवनगर ते मांजरी रस्ता हा चांगल्या दर्जाचा करण्यात यावा, अशा सूचना संबंधित कंत्राटदाराला आढळराव-पाटील यांनी दिल्या. दरम्यान, आढळराव यांनी मांजरी रस्त्याच्या कामाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. पुणे-सोलापूर महामार्गावर वाहत असलेले ड्रेनेज, महामार्गाच्या पट्ट्यात आवश्यक असलेले पार्किंग आदी प्रश्न नागरिकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी लागलीच महामार्ग अभियंत्यांशी संपर्क साधून प्रश्न सोडविण्यास सांगितले.आढळराव म्हणाले, की कारखाना चालू करण्यासाठी आम्ही आग्रही होतो; परंतु भाजपा सरकारने आम्हाला विश्वासात न घेता परस्पर कारखान्याचे प्रशासकीय मंडळ स्थापन केले. त्या प्रशासकीय मंडळात शिवसेनेच्या प्रतिनिधींपैकी एकाही व्यक्तीला संचालक म्हणून घेतले नाही. संपूर्ण संचालक मंडळात भाजपाचेच लोक घेतले आहेत. त्यातील काहींना कारखानदारीची माहितीदेखील नाही असे काही लोक त्यामध्ये निवडले. त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे.मांजरी बुद्रुक येथील रेल्वे उड्डाणपुलाचे सुमारे ५० कोटी रुपयांचे काम जीएसटीमुळे लांबणीवर पडले होते. तो प्रश्न सुटल्याने आता येत्या दोन महिन्यांच्या आत हे काम सुरू होईल. महादेवनगर-मांजरी रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम वेगोने सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्या कामाचा आपण पाठपुरावा केला आहे. पूनावाला ग्रुपच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधून हे काम साकारत आहे. मतदारसंघातील इतर मोठ्या गावांतील कचरा व इतर कामांच्या बाबतही पूनावाला ग्रुपशी आपली चर्चा सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत तीन-चार वेळा पालिका आयुक्तांशी चर्चा करून हडपसर मतदारसंघातील कचरा, पाणी, पालखी रस्ता, पुलांची बांधणी, वाहतूक आदी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न झाला आहे.- शिवाजीराव आढळरावखासदार 

टॅग्स :Puneपुणे