मराठा आरक्षणावर सरकारने काढलेला जीआर चुकीचा : पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 07:52 PM2018-11-23T19:52:45+5:302018-11-23T19:54:18+5:30
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने काढलेला जीआर हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारचा चुकीचा निर्णय कुठल्या सरकारने घेतला नव्हता.
पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने काढलेला जीआर हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारचा चुकीचा निर्णय कुठल्या सरकारने घेतला नव्हता.मुख्यमंत्री आरक्षणाच्या मुद्द्यावर पळ काढत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय.
शुक्रवारी पुण्यात आयोजित दुष्काळ निर्मूलन परिषदेला पृथ्वीराज चव्हाण यांनी हजेरी लावली त्यावेळी ते बोलत होते.मराठा आरक्षण मिळावे ही भूमिका आहे मात्र सध्याच्या 52 टक्के आरक्षणाला धक्का लागायला नको अशी काँग्रेसची भूमिका आहे, मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हा एकमताचा नाही असं दिसतंय तसेच सरकार सभागृहाच्या पटलावर हा अहवाल ठेवणार असे ही दिसत असल्याचे चव्हाण म्हणाले. मात्र सरकारने याबाबत जो जीआर काढला आहे ते पाहता मुख्यमंत्री आपली जबाबदारी झटकत आहेत, एक मंत्र्यांकडे याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना देत येणार नाही हा निर्णय स्वतः मुख्यमंत्र्यांनीचं घेतली पाहिजे, राज्यातील एक तृतीयांश लोकांचा हा प्रश्न आहे मात्र मुख्यमंत्री पळ काढतायत असा आरोप करत जी समिती याबाबत निर्णय घेईल त्या निर्णयाला पूर्णपणे मुख्यमंत्रीच जबाबदार असतील असे चव्हाण म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे तुम्हाला क्रेडिट घ्यायचे ते घ्या आम्ही अभिनंदन करू आमचा विरोध नाही फक्त निर्णय लवकर घ्या फसवाफसवी करू नका असे चव्हाण म्हणाले.
शिवसेनेच्या चलो अयोध्या यात्रेबाबत बोलताना, गेल्या चार वर्षात वेळवेळी राममंदिराचा मुद्दा राज्यकर्त्यांनी पुढे करत राजकारण केले आता बरोबर निवडणूक आल्या त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाचे हे सगळे प्रयत्न असल्याचे चव्हाण म्हणाले, निवडणुका जश्या जवळ येतील तसा हा मुद्दा अधिक तापवला जाईल आणि निवडणुकीनंतर पुन्हा सगळे विसरून जातील हा सगळा पोरखेळ सुरू आहे अशी टीका चव्हाण यांनी केली..राज्यात अनेक गंभीर प्रश्न आहेत दुष्काळ चिंताजनक आहे मात्र सरकार याबाबत गंभीर नाही असही चव्हाण म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेले ठळक मुद्दे :
- मराठ्यांना आरक्षण देताना सध्याच्या ५२ टक्के टक्के आरक्षणाला धक्का नको
- सरकारने काढलेल्या जीआरवरून मुख्यमंत्री जबाबदारी झटकत असल्याची टीका
- राज्यातील एक तृतीयांश लोकांचा प्रश्न असताना मुख्यमंत्री पळ काढत असल्याचा घणाघात
- सरकारने लवकर निर्णय घ्यावा,फसवाफसवी करू नये
- सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही
- आगामी निवडणुका बघून धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न