शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

शासकीय जमीन हडपली; आयआरबी विरोधात दोषारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 4:01 AM

लोणावळ्याजवळील पिंपळोली गावातील जमीन हडपल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय)आयआरबीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह १८ जणांच्या विरोधात सीबीआय न्यायालयात बुधवारी दोषारोपपत्र दाखल केले

पुणे : लोणावळ्याजवळील पिंपळोली गावातील जमीन हडपल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय)आयआरबीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह १८ जणांच्या विरोधात सीबीआय न्यायालयात बुधवारी दोषारोपपत्र दाखल केले. बनावट कागदपत्र बनवणे, कटकारस्थान रचून फसवणूक करणे, भ्रष्टाचार करणे याबाबी तपासात निष्पन्न झाल्याचे सीबीआयने दोषारोपपत्रात म्हटले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांनी याबाबत तक्रार दिली होती. दोषारोप दाखल झालेल्या म्हैसकर यांच्यासह ८ जणांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला.राज्य शासनाने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत पिंपळोली गावतील शेतकºयांकडून रस्ते विकास महामंडळासाठी जमीन अधिग्रहित केली होती. आयआरबी इन्फ्रास्टक्चर प्रा.लि., आर्यन इन्फ्रास्टक्चर इन्व्हेस्टमेंट प्रा.लि व ज्यो डेव्हलपमेंटकार्पोरेशन प्रा.लि. यांनी ही जमीन बेकायदेशीररित्या हडप केल्याची तक्रार सतीश शेट्टी यांनी २००९ मध्ये लोणावळा पोलीस ठाण्यात केली होती. जानेवारी २०१० मध्ये शेट्टी यांचा खून झाला. पोलिसांनी तपास करून २०१२ मध्ये वडगाव मावळ न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. परंतु, उच्च न्यायालयात प्रकरण आल्यावर सीबीआयने पुन्हा तपास सुरू केला. यात लोणावळ्यातील निलंबित दुय्यम निबंधक अश्विनी क्षीरसागर यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हस्तांतरण प्रक्रिया केल्याचे निष्पन्न झाले. आरबीआय कंपनीने बेकायदेशीरपणे जमीन हडपल्याची बाबही समोर आली.आयआरबीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह वकील अजित कुलकर्णी, ज्योती कुलकर्णी, निलंबित दुय्यम निबंधक अश्विनी क्षीरसागर, अनंत काळे, सखाराम हराळे, संतोष बोत्रा, नवीनकुमार राय, शांताराम दहिभाते, विष्णू बोंबले, अतुल भेगडे, अशोक कोंडे, नरिंदर खंडारी, सिराज बागवान, पंकज ढवळे यांच्याविरोधात सीबीआयचे वकील अ‍ॅड. मनोज चलाढणे आणि अ‍ॅड. विजयकुमार ढाकणे यांनी दोषारोपपत्र दाखल केले.आयआरबीमार्फत संलग्न आर्यन इन्फ्रास्टक्चर व ज्यो. प्रा. लि. या दोन कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या. रस्ते विकास मंडळातर्फे महामार्ग विकासासाठी शासनाच्या वतीने याच दोन कंपन्यांनी शेतकºयांकडून ७३.८८ हेक्टर जमीन ताब्यात घेतली होती.याप्रकरणी शेट्टी यांनी तक्रार दिली होती. दोषारोप दाखल झालेल्या म्हैसकर यांच्यासह८ जणांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला. आरोपींनी देश सोडून जाऊ नये. दोन सुनावणीस आरोपी गैरहजर राहिले तर त्यांचा जामीन रद्द करण्यात येईल, अशी अट यावेळी घातली.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग