"सरकार म्हणजे लबाडाघरचं जेवण"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 01:11 AM2019-03-05T01:11:14+5:302019-03-05T01:11:33+5:30

राज्यातील आणि देशातील सरकार हे शेतकरीविरोधी आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

"The Government is a Lobster meal" | "सरकार म्हणजे लबाडाघरचं जेवण"

"सरकार म्हणजे लबाडाघरचं जेवण"

Next

शेटफळगढे : राज्यातील आणि देशातील सरकार हे शेतकरीविरोधी आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. भाजपा सरकारच्या आश्वासनांना पुन्हा फसू नका आपल्याकडे एक म्हण आहे, ‘लबाडाघरचं जेवण जेवल्याशिवाय काही खरं नाही,’ तसं हे सरकार आहे, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला.
पोंधवडी (ता. इंदापूर) येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा झाली त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी मंचावर आमदार दत्तात्रय भरणे, प्रदीप गारटकर, आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, अभिजित तांबिले, हनुमंत बंडगर, यशवंत माने, सरपंच राणी बंडगर, उपसरपच मीरा भोसले, सदस्य सचिता बंडगर, बाळासाहेब खारतोडे, तुळशीराम खारतोडे, तुकाराम बंडगर, महेश शेंडगे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, की हे सरकार नुसते आश्वासन देते. पूर्तता करत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणाले, दिली का कर्जमाफी, हे सरकार फक्त थापा मारत आहे. आज साखर उचलली जात नाही. त्यामुळे साखर कारखानदारीसह शेतकरी अडचणीत आहे.
एकीकडे हजारो कोटी कर्ज घेऊन उद्योगपती फरार झाले आहेत. शेतकरी दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात असताना त्यांना मदत करणे गरजेचे आहे. मात्र अशा वेळी दुधाला दिले जाणारे अनुदान बंद केले. पाण्याचे नियोजन नाही त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांची वीजच कमी केली. त्यावर मी आणि आमदार दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांना यांना भेटून दिवसा आठ तास व रात्री दहा तास वीज देण्याचे नियोजन केले.
आपल्या भागात एकही नवीन प्रकल्प या सरकारच्या काळात आला नाही. उलट आपल्या येथे असलेला कागद प्रकल्प अडचणीतून मार्ग काढत आहे. भाजपाच्या सरकारच्या काळात समाजातील कोणताच घटक समाधानी नाही. त्याचबरोबर राज्यातील मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत यांच्या आरक्षणाचे प्रश्न सोडवले नाहीत. केवळ आश्वासने देण्यापलीकडे काहीच करत नाहीत. आता धनगर समाजालाही पुन्हा वेगळे सांगून फसविण्याच्या मार्गावर आहेत.
त्यामुळे यांच्या खोट्या आमिषाला बळी न पडता येणाºया निवडणुकात सरकार उलथून पाडा, असेही आवाहन पवार यांनी यावेळी केले. माजी सरपंच नानासाहेब बंडगर यांनी प्रास्ताविक केले.
>इंदापूरकरांना जॅकेटचा लय नाद...
दरम्यान, या कार्यक्रमाला पोंधवडीचे माजी सरपंच नानासाहेब बंडगर यांनी जॅकेट घातले होते. यावर अजित पवार यांनी बोलताना इंदापूरकरांना जॅकेटचा लयच नाद आहे, असे म्हणताच हशा पिकला. या माध्यमातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना चिमटा काढण्यास पवार विसरले नाहीत, अशी चर्चा कार्यक्रमानंतर रंगली होती. त्यामुळे यंदा हर्षवर्धन पाटील व अजित पवार यांची जुगलबंदी रंगणार, असे चित्र स्पष्ट झाले.

Web Title: "The Government is a Lobster meal"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.