शिरूर : शासनाच्या शेतकऱ्यांकडून आडत न घेण्याच्या निर्णयामुळे त्याचा बाजारपेठेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे, असे मत जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी आणि आडतदारांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांनी मात्र शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. शेतकरी आडतीमध्ये आणणाऱ्या मालावर (भाजीपाला सोडून) आडते १०० रुपयांना ३ रुपये आडत घेतात. यातून व्यापारी बाजार समितीत एक रुपया येझ भरतात. शेतकऱ्यांकडून घेतली जाणारी ही आडत बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ४दोन पैसे मिळावेत, या हेतूने व्यापारी व्यवसाय करतात. शेतकऱ्यांकडून मिळणारी ही आडत बंद झाल्यावर त्याचा बाजार समितीवर परिणाम होणार आहे. शासनाने या निर्णयाचा फेरविचार केला पाहिजे, असे मत जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील आडतदार आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. तर, शेतकऱ्यांनी मात्र शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. दोघांचे नुकसानशासनाने ३ टक्के रक्कम खरेदीदार व्यापाऱ्यांकडून घेण्याचे ठरवल्यामुळे यात शेतकरी आणि व्यापारी या दोघांचे नुकसान होणार आहे. माल खरेदी करणारा व्यापारी बाजारभाव पाडेल आणि त्यातून नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. - तात्यासाहेब टुले, सचिव, दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकऱ्यांच्या पट्टीतील आडत बंद होणार, हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. पण, ग्राहकांकडून प्रचलित दराने म्हणजेच ३ टक्के दराने आडत घ्यावी, असे परिपत्रक आहे. त्यामुळे ग्राहकांना भुर्दंड पडणार आहे. शेतकरी व व्यापारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. व्यापारी माल विकणार नाहीत, तर शेतकरी काय करणार? कर्नाटकात हा प्रयोग केला आहे. इतर मार्ग अवलंबून शेतकऱ्यांकडून पैसे काढले जातातच.- नंदकुमार जगताप, संचालक, सासवड कृषी उत्पन्न बाजार समिती आडत बंद झाल्यामुळे शेतकऱ्याचा निश्चितच तोटा होईल. शेतकऱ्यांचा माल डायरेक्ट खरेदीदाराकडे जाईल. त्या वेळी खरेदीदाराच्या मनमानी भावाने माल विकत घ्यावा लागेल. ज्या वेळी माल कमी असेल, त्याच वेळी शेतकऱ्याला फायदा होईल. ज्या वेळी उत्पादन जास्त असेल, त्या वेळी शेतकरी काही करू शकणार नाही. कारण, त्या वेळी नियंत्रण कोणाचेही नसेल. आडतदार हा शेतकऱ्यांची तेजी व मंदीतही काळजी घेतो. - विकास गांधी, आडतदार व्यापारी, बेल्हा कमी आडतीवर धंदा कोण करणार?शेतकऱ्यांच्या पट्टीतील आडत रद्द होऊन ग्राहकांकडून १ टक्का आडत घेण्यात येणार आहे. यात व्यापारी व शेतकरी या दोघांचे नुकसान आहे. आडत मिळणार नाही; मग व्यवसाय कशासाठी करायचा? शेतकऱ्यांचा माल कोण विकणार? असे प्रश्न निर्माण होतील. त्यातही ग्राहकांकडून फक्त १ टक्का घेण्याची मुभा आहे. एवढ्या कमी आडतीवर धंदा कोण करणार? असा प्रश्न आहे. व्यापारी याला विरोध करतील.- रूपचंद कांडगे, घाऊक व्यापारी, सासवडशासन आडत व्यापाऱ्यांवर जाचक अटी लावणार असेल, तर व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करणार नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांनीच आपला माल विकायचा. कारण व्यापारी नुकसान सहन करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. - सुरेंद्र बलदोटा, आडत व्यापारी, दौंडशेतकऱ्यांना फटका बसणारशासनाने आडत बंद करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा सर्वांत जास्त तोटा शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांच्या किरकोळ मालाची विक्री होईल; पण कांदा, तरकारी अशा प्रकारच्या जास्त मालाची विक्री होण्यास अडथळा येईल. मालाला भावाची हमी राहणार नाही. आडतदार असेल, तरच भाव मिळेल. तो नसेल आणि शेतकऱ्यांनी आपला माल अन्यत्र कुठे विकला, तरी त्याला पैसे मिळतील, याची नाही.- महेंद्र्र मेहेर, आडतदार, कृषी उत्पन्न बाजार समिती नारायणगावमालाचा भाव कसा ठरवावा?आडत बंद झाली, तर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळणार नाही. कोणतीही बाजार समिती शेतकऱ्यांच्या पैशाची जबाबदारी घेऊ शकत नाही. आडते हा व्यापारी व शेतकरी यांच्या मधला महत्त्वाचा घटक आहे. तो पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मालाची व पैशाची जबाबदारी घेत असतो. आडत बंद झाली, तर शेतकरी अडचणीत येऊ शकतो. शेतकऱ्याला आपल्या मालाचा भाव कसा ठरवावा, याची परिपूर्ण माहिती नसल्याने थेट माल विकताना व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. शेतकरी अडचणीत येऊ शकतो. त्याच्या कष्टाचा मोबदला त्याला मिळू शकणार नाही.- रवींद्र बोराटे, खेड बाजार समिती संचालक वाहतूक खर्च वाचणारआडत बंद करण्याचे सरकारचे धोरण चांगले आहे. दलालांचे कमिशन बंद झाल्याने शेतकरी व ग्राहक यांचा फायदा होईल. मधला खर्च वाचेल. शेतकरी हा सक्षम असल्याने स्वत:चा माल स्वत: विक्री करू शकतो. सरकारने शेतकऱ्यांना बाजारपेठ खुली करून दिली पाहिजे. व्यापाऱ्यांना थेट शेतातून मालखरेदीची परवानगी दिल्यास शेतकऱ्यांचा वाहतूकखर्च वाचून फायदाच होईल. - राम हरी आवटे, शेतकरी, चाकणसरकारने शेतकऱ्यांची जबाबदारी घ्यावीआडत बंद केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होईल. थेट माल विकताना मालाची व पैशाची हमी कोण घेणार? सरकारने शेतकऱ्यांचा माल खपवून त्यांच्या पैशाची जबाबदारी घेतली पाहिजे; पण सरकारकडे यंत्रणा सक्षम पाहिजे. सरकारने शेतकऱ्याला बाजारपेठ खुली केली पाहिजे. कोणतीही कपात न करता शेतकऱ्यांच्या मालाच्या विक्रीची हमी घेतली पाहिजे. आडते हा शेतकरी व व्यापारी यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. आडते हे शेतकऱ्याला अडीअडचणीला कोणतेही व्याज न घेता आगाऊ पैसे देतात व माल बाजारात आल्यानंतर कपात करून घेतात.- माणिक गोरे, शेतकरी, आडते चाकणव्यापारी वर्गाच्या नफ्यावर परिणाममाजी संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आडतबंदीचा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणारा आहे. आडतबंदीमुळे व्यापारीवर्गाच्या नफ्यावर परिणाम होणार आहे. त्याची कसर व्यापारीवर्गाने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडून तसेच ग्राहकांना चढ्या दराने विकून काढू नये. शासनाच्या पणन विभागाने याबाबत योग्य ते धोरण ठरवून शेतकरीवर्गाच्या पाठीशी राहावे. - अॅड. राजेंद्र शरदराव बुट्टे पाटील, माजी संचालक,कृषी उपन्न बाजार समिती, जुन्नरनिर्णय सरकारने कायम ठेवावाआडत रद्द करण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे; पण हा निर्णय लागू होणार का? मागील सरकारने निर्णय घेतला होता; पण व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे अमलात आणला नाही. आता हा निर्णय राज्य पणन संचालकांनी घेतला आहे. सरकारने तो कायम ठेवला पाहिजे.- रवींद्र ताकवले, व्यापारी, सासवडआडतीची रक्कम वाचणारआडत बंद झाल्याने शेतकऱ्यांचा फार मोठा नसला, तरी निश्चित फायदा होणार आहे. - राजेंद्र कटके, शेतकरी, गोलेगावघाईन निर्णय नकोशासनाने घाईने हा निर्णय घेऊ नये. यासाठी समिती नेमून याबाबत फेरविचार करावा.- संतोष भंडारी, उपाध्यक्ष, शिरूर व्यापारी असोसिएशन
शासनाने फेरविचार करावा
By admin | Published: December 20, 2014 11:18 PM