शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

लोकांनी बगावत करण्यापूर्वी सरकारने निर्णय मागे घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:10 AM

पुणे : इथे अनेक लोकांचे हातावर पोट आहे. या सर्व घटकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. एकीकडे आरोग्यमंत्री कोरोनाची ...

पुणे : इथे अनेक लोकांचे हातावर पोट आहे. या सर्व घटकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. एकीकडे आरोग्यमंत्री कोरोनाची ताकद कमी झाली हे सांगत आहे, तर दुसरीकडे लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घेत आहे. मात्र, लोकांनी बगावत करण्याआधी ठाकरे सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा, असा इशारा वंचित बहुजन विकास आघडीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

पुण्यात डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी सरकारच्या कठोर निर्बंधांसह विविध विषयांवर रोखठोक भाष्य केले.

आंबेडकर म्हणाले, लॉकडाऊनला आधी आम्ही विरोध केला, भाजप कॉपी कॅट आहे. पंढरपूर देवस्थान बाहेरील व्यावसायिकांना भिक्षा मागण्याची वेळ आली आहे. लोकांनी बगावत करण्याआधी ठाकरे सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा. नंतर मग आम्ही एक आणि तुम्ही दुसरी भूमिका घेताय असं म्हणू नये.

...तर आम्ही दुकानदारांसोबत राहणार

दुकानदार ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांनी दुकान उघडलं तर आम्ही त्यांच्यासोबत असणार आहोत. भले त्यासाठी तुरुंगात जाण्याची वेळ आली तर हरकत नाही, अशा शब्दांत आंबेडकरांनी या वेळी आपली भूमिका स्पष्ट केली.

रश्मी शुक्ला यांचा अहवाल महत्त्वाचा

परमबीर सिंग आणि इतर प्रकरण दाबण्यासाठी कोविड आणला का? पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींचा मास्क न घालता फोटो आहे. सरकार लॉकडाऊनबाबत वंचितसोबत बोललेले नाही, बाकीच्यांशी काय बोलले माहिती नाही. अमित शहा काय देशाचे मालक नाही, तर प्रत्येक जण मालक आहे. तुम्ही फक्त त्या खुर्चीवर आहात. त्यांच्यात काय चर्चा झाली यापेक्षा रश्मी शुक्ला यांचा अहवाल काय आला हे महत्त्वाचं आहे, असाही टोला आंबेडकर यांनी या वेळी लगावला.