सत्तेसाठी सरकार दंगली घडवेल, अजित पवारांंची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 12:10 AM2019-02-18T00:10:01+5:302019-02-18T00:10:27+5:30

माळेगाव येथे जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्या प्रयत्नातून विविध लाभांच्या वस्तूंचे वाटप व भूमीपुजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्या कामाचे देखील पवार यांनी कौतुक केले.

 Government will create riots, Ajit Pawar's fatal criticism | सत्तेसाठी सरकार दंगली घडवेल, अजित पवारांंची घणाघाती टीका

सत्तेसाठी सरकार दंगली घडवेल, अजित पवारांंची घणाघाती टीका

Next

बारामती : ‘‘शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजारांची मदत हा जुमला आहे. देशात घडणाºया विविध घटना पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी छुप्या पद्धतीने हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. सत्तेसाठी हे सरकार देशात दंगली घडवतील, अशी घणाघाती टिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

माळेगाव येथे जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्या प्रयत्नातून विविध लाभांच्या वस्तूंचे वाटप व भूमीपुजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्या कामाचे देखील पवार यांनी कौतुक केले. पवार पुढे म्हणाले, पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला हा देशाच्या अस्मितेवरील हल्ला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकरी विरोधी धोरण चुकिचे आहे. तेलंगणात राबविलेली शेतकरी सन्मान योजना शेतकरी हिताची आहे. तेथे शेतकºयांना विस हजार वार्षिक मदत केली जाते. मात्र केंद्र सरकारची शेतकरी सन्मान योजना म्हणजे जुमलेबाजी आहे. गॅस दरवाढीने सर्वसामान्य यांचे कंबरडे मोडले आहे. तसेच घटना जाळणे किंवा बदल करणे हा छुपा अजेंडा आहे. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्रीला उपोषण करावे लागणे हे देशाच्या इतिहासात प्रथम घडले आहे, अशी टिका पवार यांनी केली. यावेळी सभापती संजय भोसले, रोहिणी तावरे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविराज तावरे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामती टेक्साटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, सभापती संजय भोसले, बांधकाम आरोग्य सभापती प्रविण माने, संभाजी होळकर, राणी शेळके, सुजाता पवार, तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार सचिन तावर यांनी मानले.

समविचारी पक्षांना घेऊन निवडणुका लढवणार...
स्वबळाची भाषा करणारी शिवसेना व भाजपची युती नक्की होणार आहे. आम्ही देखील समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुक लढवणार आहोत. सध्या दुष्काळाचे संटक गंभीर आहे. मात्र या शासनाने दुष्काळ निवारणासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. जनावरांच्या चारा छावण्या, दुध दर, फसलेली कर्जमाफी या सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले आहे.
 

Web Title:  Government will create riots, Ajit Pawar's fatal criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.