शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

३७० कलमानंतर आरक्षणही रद्द करण्याचा सरकारचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 9:28 PM

पुण्यात वडार समाजाच्या वतीने सत्ता संपादन मेळाव्याचे आयोजन केले होते़.  मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ . 

पुणे : आरएसएस हे आरक्षणवादी नाही़. ज्याप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये मुक्ती मोहम्मदसाहेबांचा वापर करुन नंतर ३७० कलम रद्द केले़,त्याप्रमाणे महाराष्ट्र, हरियाणा, झारखंडच्या निवडणुका संपल्यानंतर संपूर्ण सत्ता त्यांच्या ताब्यात येणार आहे़,त्यामुळे ते आरक्षण संपविल्याशिवाय राहणार नाही़, आरक्षित वर्गाने सावध होणे हीच वेळ आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले़.  पुण्यात वडार समाजाच्या वतीने सत्ता संपादन मेळाव्याचे आयोजन केले होते़.  मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ . अ‍ॅड़ आंबेडकर यांनी सांगितले की, भाजपाने वंचित समाजाला केवळ आश्वासने दिली़. मात्र त्यांना सत्ता दिली नाही़ तर आरक्षण संदर्भात मोहन भागवत यांनी आरक्षणावर समीक्षा झाली पाहिजे, असे म्हटले आहे़.  त्यामुळे ते आरक्षण संपविल्याशिवाय राहणार नाहीत़.  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी म्हणून अस्तित्व कमी होऊ लागले आहे़. त्यामुळे ज्यांना जिंकून येणार नाही असे वाटते ते जिंकणारा पक्ष म्हणून भाजपमध्ये जात आहे़.  ज्यांनी भ्रष्टाचार केला ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवाले भाजपमध्ये जात आहे़.  त्यामुळे भाजप चोरांचा पक्ष होतोय का असा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले़ . २ जी घोटाळा झाला तेव्हा बीजेपी, आरएसएस, अण्णा हजारे पुढे आले़ मात्र, त्यांना सोडल्यावर अण्णा झोपले होते आणि भाजपने पुरावा दिला नसल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला़.  आघाडी संदर्भात आम्ही काँग्रेसला ऑफर दिली आहे़. . आमची उद्या आणि परवा बैठक आहे़.  त्यात निर्णय होईल़ वेळ कमी असून आम्ही कोणासाठी थांबणार नाही़.  आम्ही पुढे आगेकुच करणाऱ आमच्याच पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना आम्ही उमेदवारी देणार आहोत़ बाहेरच्या उमेदवारांना आम्ही उमेदवारी देणार नसल्याचे आंबेडकर यांनी सांगितले़.  मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, आपली सत्तास्थाने धोक्यात आल्यावर ते सर्व भाजपमध्ये जात आहे़ मावळे गेले, आता राजेही जात आहे़.  इतकी वर्षे त्यांनी सर्व निधी स्वत:साठी वापरला़,निधीची कमरतता नाही़. ती उपेक्षित समाजाला देण्याची नियत पाहिजे़ त्यासाठी आपण सत्तेत बसले पाहिजे़ इलेक्शन म्हणजे स्वत:ला विकण्याचा दिवस हे बंद झाले पाहिजे़ यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव नवनाथ पडळकर, अनिता जाधव, प्रभावती वाडकर, प्रियंका सोळंकी यांची भाषणे झाली़ महासचिव अनिल जाधव यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते़ या मेळाव्यात अनेकांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला़ .   

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपा