पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. कोश्यारी यांचे सोमवारी (दि. १८) राजभवनात आगमन झाले. या वेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्यांचे स्वागत केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग आदी यावेळी उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मंगळवारी (दि. १९) सकाळी साडेअकरा वाजता प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचालित मॉडर्न कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सांगता कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. दुपारी साडेचारला एफटीआयआय संस्थेच्या ‘नभ अभिप्सा’ अद्वितीय धातु कला स्थापना (हीरकमहोत्सवी- १९६०-२०२०) उद्घाटनास उपस्थित राहणार आहेत. बुधवारी (दि. २०) दुपारी ३ वाजता ते मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.