पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे शुक्रवारी (दि. ११) पुणे येथील राजभवन येथे आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वागत केले. राज्यपाल तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून, शनिवार, रविवारी नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारा (दि. १२) दुपारी बारा वाजता लेक्सीकॉन कॅम्पस, वाघोली येथे ‘द लेक्सिकॉन लिडरशिप ॲवार्ड’ प्रदान कार्यक्रम आहे. तसेच सायंकाळी पाच वाजता राजभवन येथे लहान मुलांवरील हिंदी कवितांवर आधारित चित्रसंग्रही पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तर रविवारी (दि. १३) सकाळी दहा वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सुषमा नहार संपादित ‘गुरु ग्रंथ साहिब मधील संत नामदेव’ या पुस्तकाच्या विशेष आवृत्तीचे प्रकाशन त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.