पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या पुणे दौ-यावर येत आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते रविवार (दि.१५) ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कळविले आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्यपाल किल्ले सिंहगडावर जाणार आहेत.
दरम्यान १६ ऑगस्ट रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चक्क सिंहगडाला भेट देणार आहे. या पूर्वी आपल्या पुणे दो-या दरम्यान त्यांनी ऑगस्ट महिन्यात शिवनेरी गड सहज सर केला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वयाच्या ७९ वर्षी पायी चालत शिवनेरी किल्ला सर केला. अशा प्रकारे पायी शिवनेरी किल्ला सर करणारे ते पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. राज्यपालांनी पायीच हा गड सर केल्याने सर्वच जण अवाक् झाले होते. आता ते शिवनेरीनंतर सिंहगड सर करणार आहेत. राज्यपालांची अंगकाठी अतिशय काटक असल्याने आणि ते दररोज नियमित सकाळी चालतात. त्यामुळे त्यांची तब्येत ठणठणीत दिसून येते. यापूर्वी ते किल्ले शिवनेरीवर पायी गेले असताना म्हणाले होते की, मी डोंगरं चढलेला माणूस आहे. त्यामुळे गड सर करणे माझ्यासाठी कठीण काम नाही.’’