राजगुरुनगर येथील पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, राज्यपाल हे केंद्राचे पॉलिटिकल एजंट असतात. त्यांची नेमणूक राजकीय असते. त्यामुळे त्यांची भूमिका तटस्थ नसते. आपले राज्यपाल हे केंद्रात मंत्री होते. ते भाजपचे सदस्य होते, तसेच संघ प्रचारक होते. त्यामुळे भाजपला जे हवे आहे तेच ते करतील.
राऊत म्हणाले, ब्रिटिश काळातच राज्यपालांना ‘पाॅलिटिकल ॲडव्हायझर’ ही उपाधी दिली गेली आहे. राज्यात काय घडत आहे त्याची माहिती देण्याचे काम त्याकाळी राज्यपाल करत होते.
नारायण राणे यांच्यावर केलेली कारवाई द्वेषापोटी आहे का, यावर राऊत म्हणाले, महाविकास आघाडी सरकार पक्षपातीपणे काम करत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीही बेकायदेशीर काम करणार नाहीत. जे लोक उद्धव ठाकरेंना राजकीय व्यक्ती म्हणून ओळखतात त्यांना हे पक्के माहीत आहे.