हडपसर: शहरात चौकाचौकात मोठमोठ्या रक्कमे दहीहंडीचे बॅनर झळकत आहेत. गोविंदा पथकांना गोकुळअष्टमीचे वेध लागले आहेत. सर्व ठिकाणी दहीहंडीचे मोठ्या वाजत- गाजत आपल्याच दहीहंडी इतरांपेक्षा कशी हटके असेल याकडे सर्व नेते, कार्यकर्ते इच्छुक आहेत. यातला आकर्षणाचा मुद्दा म्हणजे दहीहंडी फोडणाऱ्या पथकांसाठी ठेवलेले मोठ्या रक्कमांचे आकडे येणाऱ्या- जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेतात. पण आकर्षणापाठीमागे एक धक्कादायक आणि वेदनादायी सत्य दडलेले आहे. दरवर्षी गोविंदा पथकांना अक्षरश: या दहीहंडीच्या कार्यक्रमात चुना लावला जातो. गोविंदा पथकांनी दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडी निमित्त लावण्यात येणाऱ्या जाहिरातबाजीच्या फलकांवरचे फुगवलेले रक्कमांचे आकडे फक्त जहिरातबाजीसाठी असतात. जाहीर केलेल्या रक्कमेच्या २५ टक्के रक्कम फक्त दहीहंडी फोडल्यानंतर आम्हाला मिळते. सेलिब्रिटी व डीजेवर भरमसाठ खर्च करून ज्यांचे मुख्य आकर्षण त्या पथकांना फक्त मोठ्या रक्कमेची आशा लावली जाते. मात्र, दरवर्षी बक्षिसांची रक्कम भली मोठी असते. मात्र, अनेक मंडळांनी बक्षिसाची रक्कम गेल्या काही वर्षी तोकडीच दिली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्ष पासून गोविंदांमध्ये नाराजी पसरली होती. गोकुळाष्टमी म्हटले दहीहंडी आणि ती फोडण्यासाटी गोविंदांची धामधूम असते. एकेकाळी उपनगर आणि परिसरामध्ये हजाराची दहीहंडी आता लाखावर नव्हे, तर कोटी रुपयांवर गेली आहे. ही अभिमानाची बाब असली तरी, बक्षीसाची रक्कम मात्र तेवढी मिळत नसल्याची खंत अनेक गोविंदा पथकांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी अनेक मंडळांनी लाखो रुपयांची बक्षिसे देणार, अशी जाहिरात केली. मात्र, प्रत्यक्षात अगदी काही हजार रुपयेच हातात टेकवले, त्यामुळे गोविंदाचा हिरमोड झाला. गोविंदा रे गोपाळा अशी आरोळी ठोकत दहीहंडी फोडण्यासाठी एकच गलका सुरू होतो आणि प्रेक्षकांची गर्दी जमते. गोविंदा थरावर थर रचत असताना, त्यांच्या अंगावर पाणी मारले जाते. त्यामुळे एखादा गोविंदा अंग चोरतो आणि थर ढासळतात. गोविंदा पथक दक्षता घेत असल्यामुळे मोठे अनर्थ टळतात. मात्र, त्यातूनही एखादी दुर्घटना दरवर्षी घडतेच. तरीही गोविंदामधील जोष, उत्साह काही औरच असतो. शहराबरोबर उपनगर आणि ग्रामीण भागातही दहीहंडी उत्सवाचे पिक आले आहे. उत्सवाच्या माध्यमातून आपसातील मतभेद दूर व्हावेत, अशी संकल्पना असली पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही, हे दुर्दैव आहे. प्रत्येक गावात, गल्लीबोळात, वस्तीमध्ये स्वतंत्र उत्सव होऊ लागले आहेत. उत्सवाला काहीसे गालबोट लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी तरुणांनी नव्या विचाराची पेरणी करून समाजात दुही होणार याची काळजी घेणे गरजेचे आहे. या उत्सवामध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढला आणि त्याला बाजारी स्वरूप आल्यासारखे झाले आहे. दहीहंडीच्या उद्घाटनासाठी लाखो रुपये खर्च करून मंडळे सिनेतारे-तारकांना बोलावतात. सिनेतारकांमुळे गर्दी वाढते आणि गोविंदा पथकेही आपोआप येतात. गोविंदा पथक हे बक्षिसासाठी नव्हे, तर आनंद म्हणून येतात, याचा विसर कदाचित बाजारू मंडळाां पडलेला दिसतो.दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांना लाखो रुपयांची बक्षिसे देणार अशी जाहिरातबाजी करायची हा फंडा सुरू झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मंडळे लाखाची बक्षिसे देत नाहीत, अशी ओरड आहे.
गोविंदांना दरवर्षी लावला जातो चुना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 9:57 PM
गोकुळाष्टमी म्हटले दहीहंडी आणि ती फोडण्यासाटी गोविंदांची धामधूम असते. एकेकाळी उपनगर आणि परिसरामध्ये हजाराची दहीहंडी आता लाखावर नव्हे, तर कोटी रुपयांवर गेली आहे.
ठळक मुद्देया उत्सवामध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढला आणि त्याला बाजारी स्वरूप आल्यासारखेएकेकाळी उपनगर आणि परिसरामध्ये हजाराची दहीहंडी आता लाखावर