लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघातून प्रत्येकी एकच आमदार निवडून द्यायचा आहे. परंतु, या निवडणुकीसाठी पाच जिल्ह्यातील संपूर्ण महसूल यंत्रणा कामाला लागते. यामुळेच केंद्रीय निवडणूक आयोगाने इतर निवडणुका प्रामाणे पदवीधर व शिक्षकची निवडणूक देखील ईव्हीएम मशीनवर घ्यावी. या संदर्भातील प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविणार असल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारांना सांगितले.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघातून प्रत्येक एक आमदार निवडून द्यायचा आहे. यासाठी विभागातील पुणे, सांगली, सोलापूर, सातार आणि कोल्हापूर हे पाच जिल्हे मतदार संघ आहे. एकूण मतदारांची संख्या लक्षात घेता आणि एकच उमेदवार निवडून द्यावयचा असला तरी निवडणुकीसाठी राबणारी यंत्रणा खूपच मोठी आहे. यामुळे ही निवडणूक देखील ईव्हीएम मशीनवर घ्यावी. यामध्ये मतदारांना पसंती क्रमांक देण्याचे बंधन घालावे. त्यामुळे या संदर्भात प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठविणार असल्याचे राव यांनी सांगितले. यासाठी कायद्यात बदल करावा लागेल असे देखील राव यांनी स्पष्ट केले.