सासवड : रविवारी झालेल्या पुरंदर तालुक्यातील तीन ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने नावळी ग्रामपंचायतीत सर्वच्या सर्व जागा मिळवल्या. दवणोवाडीत काँग्रेसने पाच जागा मिळवीत ग्रामपंचायत ताब्यात घेतली, तर धनकवडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी व शिवसेना दोघेही आपला दावा करीत आहेत.
दवणोवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नवनिर्वाचित ज्ञानेश्वर दशरथ साळुंखे (बिनविरोध), अंजली संजय ताकवले, संगीता पोपट जाधव, लक्ष्मी दशरथ साळुंखे (बिनविरोध), छबुबाई मुरलीधर दवणो, सुनीता बाळासाहेब दवणो, संजय शिवाजी धुमाळ हे विजयी झाले आहेत.
नावळी ग्रामपंचायतीची निवडणूक सहा जागांसाठी झाली. त्यापैकी एक जागा बिनविरोध आली आहे. कांताबाई माणिक साळुंखे, शालन उत्तम म्हस्के, विठ्ठल दिनकर म्हस्के, नीता शांताराम गिरमे (बिनविरोध), विजय भागोजी चौरे, दत्तात्नय मारुती चौरे, माधुरी संजय म्हस्के हे या ठिकाणी निवडून आले आहेत.
धनकवडी या ठिकाणी अंकुश किसान जगताप, रंजना बाळासाहेब खोपडे, फुलाबाई रघुनाथ ताकवले, उमेश नारायण गायकवाड, सुरेश बाबूराव खोमणो, सुमन बाळासो खोमणो तर एक जागा रिक्त राहिली आहे.
धनकवडी येथे राष्ट्रवादी आणि शिवसेना युती आहे. यांच्या चार जागा निवडून आल्या. मात्न, सरपंचपदाचा उमेदवार यांच्याकडे नाही. या पदाचा उमेदवार काँग्रेसचा बिनविरोध आल्याने सरपंचपदी काँग्रेसच्या उमेदवाराचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्न, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे संख्याबळ जास्त असले तरी या ठिकाणी या पदाची निवडणूक ही बिनविरोधच होणार आहे.