- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या १३७ जागांसाठी शनिवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सायकाळी साडेसहा वाजेपर्यत ५८.९६ टक्के तर ३२ ग्रामपंचायतीच्या ९० जागांसाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीसाठी ७०.०९ टक्के मतदान झाले आहे. येत्या ३० मे रोजी मतमोजणी होणार असल्याने उमेदवारांना निकालासाठी काही दिवस वाट पाहवी लागणार आहे. जिल्ह्यातील आंबेगाव , शिरूर आणि पुरंदर तालुक्यातील प्रत्येकी एक आणि हवेली तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शनिवारी मतदान झाले. या चारही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सुमारे २८ हजार ९७६ मतदारांनी मतदान केले. त्यात १३ हजार २३९ महिला तर १५ हजार ७३७ पुरूष मतदारांचा समावेश आहे. हवेली तालुक्यातील उंड्री , पिसोळी, आंबेगाव बुद्रुक आणि नांदेड या चारही ग्रामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सकाळी साडेनऊ वाजेपर्यत ११.२३, साडेअकरा वाजेपर्यत २०.०२, दीड वाजेपर्यत ३३.५२, चारवाजेपर्यत ४३.७९ टक्के तर साडेसहा वाजेपर्यत ५३.९९ टक्के मतदान झाले आहे. तर आंबेगाव तालुक्यातील गलांडेवाडी (ओगलेवाडी) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सकाळी साडेनऊ वाजेपर्यत २०, साडेअकरा वाजेपर्यत ४४.३८, दीड वाजेपर्यत ६० चार वाजेपर्यत ६५.७५ टक्के तर साडे सहावाजेपर्यत ७०.४१ टक्केमतदान झाले. जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत एकूण ७०.०९ टक्के मतदान झाले. पोटनिवडणुकीत सायकांळी चार वाजेपर्यत सरासरी ६० टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यातील इंदापूर तालुका दोन, खेड चार, मुळशी सहा, आंबेगाव तीन, हवेली तीन,मावळ एक, पुरंदर तीन , जुन्नर सात, आणि शिरूर तालुक्यातील तीन अशा मिळून एकूण ३२ ग्रामपंचातीच्या निवडणुका होत्या. यामध्ये इंदापूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत साडेसहा वाजेपर्यत ६४.०४ टक्के, खेड तालुक्यात चार ग्रामंपचायतीसाठी ५९.०४ टक्के, मुळशी तालुक्यातील सहा ग्रामपंचातीसाठी ८०.८० टक्के, आंबेगाव तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीसाठी ७२.१७ टक्के, हवेली तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीसाठी ७६.८६ टक्के, मावळ तालुक्यातील एक ग्रामपंचायतीसाठी ७३.१५ टक्के, पुरंदर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीसाअठी ८१.३२ टक्के, जुन्नर तालुक्यातील सात ग्रामपंचायतीसाठी ६२.३० टक्के, आणि शिरूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीसाठी ८१.२७ टक्के मतदान झाले आहे.