लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य शासनाने ग्रामपंचायतीच्या ४५ कोटी ४९ लाख ६२ हजारांचा मुद्रांक शुल्क निधीचा पहिला हप्ता पुणे जिल्हा परिषदेला नुकताच दिला आहे. या मुद्रांक शुल्क निधीचे तालुकानिहाय वाटप लवकरच करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील खरेदी-विक्री व्यवहारांच्या प्रमाणानुसार राज्य सरकारकडून एक टक्का मुद्रांक शुल्क जिल्हा परिषदेला दिले जाते. या मिळणाऱ्या एकूण मुद्रांक शुल्कापैकी निम्मे जिल्हा परिषदेला व निम्मे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मिळते.ग्रामपंचायतींना दिली जाणारी रक्कम ही संबंधित गावाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या खरेदी-विक्री व्यवहाराच्या प्रमाणानुसार दिली जाते. राज्य शासनाकडे मुद्रांक शुल्कची १८९ कोटी ५७ लाख ७५ हजार रुपयांची थकबाकी आहे.
ग्रामपंचायतीला ४५ कोटींचा पहिला हप्ता मिळाला
By admin | Published: June 30, 2017 3:35 AM