शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायती झाल्या मालामाल; पाच वर्षातील सर्वाधिक कर वसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 6:51 PM

पुणे : गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीचा मोठा फटका शासनाच्या सर्वच विभागांच्या कर वसुलीला बसला आहे. यामुळे गत वर्षी ...

पुणे : गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीचा मोठा फटका शासनाच्या सर्वच विभागांच्या कर वसुलीला बसला आहे. यामुळे गत वर्षी ग्रामपंचायत करामध्ये देखील मोठी घट होऊन कोट्यवधी रुपयांची थकबाकी निर्माण झाली होती. परंतु कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने सुरूवाती पासूनच कर व थकबाकी वसुलीवर अधिक लक्ष केंद्रीत केले. यामुळेच गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक कर वसुली करत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने नवा विक्रम केला आहे.

गेले दोन वर्षे कोरोना आणि लाॅकडाऊनचा फार मोठा फटका सर्वसामान्यासह सरकारी तिजोरीला देखील बसला आहे. परंतु कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर बाजारपेठेवर चांगला परिणाम आर्थिक स्थितीवर होताना दिसत आहे. कोरोनामुळे गत वर्षी ग्रामपंचायतींच्या घरपट्टीत 17 कोटी 13 लाखांची व पाणीपट्टीची 15 कोटी 71 लाख रुपयांची थकबाकी झाली होती. चालू आर्थिक वर्षांत थकबाकी वसुलीसह नवीन घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीवर अधिक भर देण्यात आला. यामुळेच जिल्ह्यात घरपट्टीमध्ये तब्बल 335 कोटी 44 लाख रुपयांची वसुली करण्यात आली. तर पाणीपट्टीत 53 कोटी 22 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतींनी यावेळी घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले. अनेक ग्रामपंचायतीने थकबाकीसह चालू कर भरल्यास सवलत योजना जाहीर केल्या. याचा चांगला परिणाम झाला असून ग्रामपंचायतींच्या कर वसुलीमध्ये वाढ झाली आहे. कोरोना संकटानंतर प्रशासनाने केलेल्या विशेष प्रयत्नामुळे गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक कर वसुली झाली.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची ऑक्टोबर अखेर पर्यंत तालुकानिहाय घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीतालुका       घरपट्टी                  पाणीपट्टी आंबेगाव    8 कोटी 4 लाख    2 कोटी 85 लाख बारामती    11 कोटी 43 लाख   7 कोटी 46 लाखभोर           8 कोटी  72 लाख    2 कोटी 40 लाखदौंड           10 कोटी 75  लाख    2 कोटी 8 लाख हवेली        47 कोटी 21 लाख    6 कोटी 18 लाख इंदापूर        13 कोटी 77 लाख     4 कोटी 1 लाखजुन्नर          32 कोटी 23 लाख      7 कोटी 80 लाख खेड            20 कोटी 54 लाख   2कोटी 21 लाख मावळ         33 कोटी 23 लाख    5 कोटी 58 लाखमुळशी         79  कोटी 54 लाख    3 कोटी 78 लाखपुरंदर             9 कोटी 10 लाख     3 कोटी 51 लाखशिरूर           58  कोटी 62 लाख    4 कोटी 46 लाखवेल्हा              1 कोटी 66 लाख     74 लाखएकूण             335 कोटी 44 लाख    53 कोटी 22 लाख -------घर पट्टी वसुलीत मुळशी तालुका आघाडीवर जिल्ह्यात सर्वाधिक तब्बल 79 कोटी 54 लाख रुपयेघर पट्टी वसुल करून आघाडी घेतली आहे. राज्यात अनेक लहान जिल्ह्यांन पेक्षा मुळशी तालुक्यात झालेली घर पट्टी वसुली ही अधिक आहे. तर पाणी पट्टी देखील 3 कोटी 78 वसुल केली आहे. रक्कमेमध्ये मुळशी तालुका आघाडीवर असला तरी टक्केवारीमध्ये तब्बल 90 टक्क्यांपेक्षा अधिक  घर पट्टी आणि पाणी पट्टी लसुल करून जुन्नर तालुका आघाडीवर आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीचा ग्रामपंचायत कर वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. परंतु यंदा सर्वच ग्रामपंचायतींना जास्तीत जास्त वसुल करण्याचे आदेश दिले, त्यासाठी विविध योजना, सवलती जाहीर केल्या. याचे चांगले परिणाम झाले असून,  जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गेले पाच वर्षातील सर्वाधिक कर वसुली करून नवा विक्रम केला.- सचिन घाडगे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत 

टॅग्स :Puneपुणेgram panchayatग्राम पंचायतTaxकरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड