चौफुला (ता. दौंड) येथे वाटलूज ग्रामपंचायतीचे सदस्य दत्तात्रय काकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपतालुका प्रमुख स्वप्निल खांदवे व तालुक्यातील अंकुश शेंडगे, गणेश वाळके, किशोर येचकर, बापू भंडलकर, विजय जाधव, दिलीप भागवत यांसह अनेक युवकांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे वाटलूज ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय काकडे यांनी स्पष्ट केले. तर शिवसेना जनहिताच्या कामाची बांधिलकी जोपासत सर्वसामान्यांना संकटकाळात मदतीचा हात देत आहे. हे सामाजिक कार्य असेच जोमाने सुरू ठेवण्यात येईल, असा शब्द जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी या वेळी दिला.
या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास दिवेकर, शिवसेना तालुका महिला संघटिका छाया जगताप, उपतालुका प्रमुख नवनाथ जगताप, विजयसिंह चव्हाण, युवासेना तालुका समन्वयक समीर भोईटे, शिवसेना विभागप्रमुख हनुमंत निगडे, काका परदेशी, शिवसेना उपविभाग प्रमुख रामदास काळभोर व शिवसेनेचे माऊली आहेर, प्रशांत जगताप, शंकर शितोळे, निरंजन ढमाले, बाळासाहेव कोंडे, नाना भांडवलकर, राजेंद्र जाधव व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.