Gram Panchayat Results in Pune : वेल्ह्यात मनसेचे सर्वाधिक सदस्य पण सरपंचपदी काँग्रसची सरशी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 04:06 PM2022-12-20T16:06:49+5:302022-12-20T16:18:46+5:30

सर्वात चुरशीची लढत दापोडे ग्रामपंचायतीत झाली...

Gram Panchayat Results in Pune : Congress wins in Gram Panchayat elections | Gram Panchayat Results in Pune : वेल्ह्यात मनसेचे सर्वाधिक सदस्य पण सरपंचपदी काँग्रसची सरशी

Gram Panchayat Results in Pune : वेल्ह्यात मनसेचे सर्वाधिक सदस्य पण सरपंचपदी काँग्रसची सरशी

Next

वेल्हे : वेल्हे तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमदार संग्राम थोपटे यांचे वर्चस्व कायम राहिले असून सर्वाधिक जागा काँग्रेसला (१२) मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादी १० ठिकाणी, शिवसेना ठाकरे गटाला ३ जागा, भारतीय जनता पार्टीला २ जागा आणि वंचित बहुजन विकास आघाडीला १ जागा तर सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून आले आहेत.

सर्वात चुरशीची लढत दापोडे ग्रामपंचायतीत झाली आहे. या ग्रामपंचायतमधील १५ वर्षाची राष्ट्रवादीची सत्ता गेली असून काँग्रेसने बाजी मारली आहे. तर माजी सभापती संगीता जेधे यांना जिंकण्यासाठी स्वत: मतदान केंद्रांच्या ठिकाणी बुथवर बसावे लागले. त्यांचे पती प्रकाश जेधे या ठिकाणी विजयी झाले आहेत. तर लव्ही बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेवारांमध्ये लढत झाली असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांचे संयुक्तिक उमेदवार शंकर रेणुसे विजयी झाले आहेत.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोरावळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंबवणे येथे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची बैठक घेतली होती. परंतु याठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पॅनल पडला असून वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार सुषमा बापू शिंदे या विजयी झाल्या आहेत. माजी सभापती दिनकर सरपाले यांच्या गावातून निवृत्ती एकनाथ जाधव हे विजयी झाले आहेत.

गावाचे नाव - सरपंचाचे नाव - पडलेली मते

१) सोंडे सरपाला - गायकवाड सोपान दिनकर १६६,

२) सोंडे कार्ला - युवराज बबन कार्ले १४६,

३) शिरकोली - अमोल भीमराव पडवळ २२३,

४) हारपूड - कुमकर अंकुश दत्तू १९२,

५) वेल्हे खुर्द - जेधे प्रकाश मारुती ४४७,

६) कोशिमघर - रमेश किसन कडू १७५,

७) गोंडेखल - नीलेश विठ्ठल कडू १३२,

८) कोलंबी - शितल अंकुश कोडीतकर २३९,

९) बोरावळे - सुषमा बापू शिंदे - २०३,

१०) गुंजवणे - रसाळ लक्ष्मण म्हकाजी - ३०५,

११) केळद - आश्विनी ऋषिकेश भावळेकर - ६८०,

१२) मोसे बुद्रुक - किसन बबन बावधने - ९१,

१३) गिवशी- बाळासाहेब धाऊ मरगळे- १०४,

१४) वाजेघर बुद्रुक - स्वाती संतोष काबदुले - ३३२,

१५) सोंडे हिरोजी - निवृत्ती एकनाथ जाधव - १६७,

१६) लव्ही बुद्रुक - शंकर कृष्णा रेणुसे -३७५,

१७) पाल बुद्रुक - नीता किरण खाटपे - ३२६,

१८) बालवड- विशाल तुळशीराम पारठे -१३९,

१९) चिरमोडी - अलका विजय गिरंजे - ५३१,

२०) सोंडे सरपाले - पूनम प्रकाश बढे - २९८,

२१) दापोडे - संदीप चंद्रकांत शेंडकर ६७३,

२२) कोंडगाव - पूनम पांडुरंग दारवटकर ३७३,

२३) धानेप - राहुल सुरेश मळेकर -३७९,

२४) टेकपाळे - मंगल दिनकर बामगुडे १७६,

२५) आंबेगाव खुर्द - प्रियंका नवलेश पंडित बिनविरोध,

२६) शेनवड - लक्ष्मण दगडू शिंदे बिनविरोध,

२७) जाधववाडी - शीतल कृष्णा तुपे बिनविरोध,

२८) वडघर - सुवर्णा नथुराम डोईफोडे - बिनविरोध,

Web Title: Gram Panchayat Results in Pune : Congress wins in Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.