Gram Panchayat Results in Pune Live: बारामती, खेड, मुळशी, इंदापूर, वडगाव मावळमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व; दौंडमध्ये भाजप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 11:08 AM2022-12-20T11:08:36+5:302022-12-20T14:09:19+5:30

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम...

Gram Panchayat Results in Pune Live 221 gram panchayat ncp congress shivsena bjp mns aap | Gram Panchayat Results in Pune Live: बारामती, खेड, मुळशी, इंदापूर, वडगाव मावळमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व; दौंडमध्ये भाजप

Gram Panchayat Results in Pune Live: बारामती, खेड, मुळशी, इंदापूर, वडगाव मावळमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व; दौंडमध्ये भाजप

googlenewsNext

पुणेजिल्ह्यात २२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यापैकी ४५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने रविवारी (ता.१८) १७६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींपैकी ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. तर १७६ ग्रामपंचायतींसाठी मतदान रविवारी झाले. यात सदस्यपदाच्या १ हजार ६२ जागांसाठी ३ हजार ३१३ उमेदवार रिंगणात होते. तर सरपंचपदाच्या १६७ जागांसाठी ५१९ उमेदवार रिंगणात होते. सबंध जिल्ह्यात या निवडणुकीसाठी मतदानात चुरस पहायला मिळाली. त्यामुळे सुमारे ८१ टक्के मतदान झाले होते. आज लागलेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती, खेड, मुळशी, इंदापूर, वडगाव मावळमध्ये बाजी मारली आहे. तर दौंडमध्ये भाजपने सर्वाधिक ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवला आहे.

सकाळी दहा वाजल्यापासून निकाल येण्यास सुरुवात झाली होती. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड का मानला जातो, हे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. आज लागलेला सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे-

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे निकाल पुढीलप्रमाणे :

- साकोरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा गाडगे (शिवसेना) विजयी

- आणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या प्रियांका दाते विजयी

बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम- 

१)वाणेवाडी ग्रामपंचायत—गीतांजली जगताप
२)कुरणेवाडी—आशा किसन काळभोर
३)मुरुम—संजयकुमार नामदेव शिंगटे
४)पणदरे—अजय कृष्णा सोनवणे
५)लोणी भापकर—गीतांजली रविंद्र भापकर
६)सोरटेवाडी—भारती अनिरुध्द सोरटे
७)वाघळवाडी—हेमंत विलास गायकवाड
८)मोरगांव—अलका पोपट तावरे
९)पळशी—काळे ताई
१०)गडदरवाडी—मालन पांडुरंग गडदरे
११)मासाळवाडी—मुरलीधर किसन ठोंबरे
१२)का-हाटी —दिपाली योगेश लोणकर
१३)सोनकसवाडी—राणी सतीश कोकरे.

दौंडमध्ये भाजपचे वर्चस्व-

दौंड तालुक्यामध्ये ८ पैकी ६ ग्रामपंचायतमध्ये भाजपने दणदणीत यश. आमदार राहुल कुल समर्थकांना ६ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी १ ठिकाणी व काँग्रेस १ ठिकाणी विजयी झाले आहेत. पाटेठाण, नांदूर, दहिटणे, देवकरवाडी, बोरीभडक, लोणारवाडी ठिकाणी भाजपा विजयी झाला आहे. पाटेठाण ग्रामपंचायतचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी असल्याने रिक्त राहिले असले तरी त्या ठिकाणी भाजपाची सत्ता आली आहे. तसेच नांदूर येथे युवराज बोराटे, दहीटणे आरती गायकवाड, देवकरवाडी तृप्ती दिगंबर मगर, बोरीभडक कविता कोळपे व लोणारवाडी येथे प्रतीक्षा हिवरकर विजयी झाले आहेत.

इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व 

तालुक्यात २६ ग्रामपंचायतींपैकी  १३ ग्रामपंचायतींवर सत्ता आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी केला आहे. १० ग्रामपंचायतीवर भाजपची तर ३ ग्रामपंचायतींवर संमिश्र सत्ता आल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. लाखेवाडी ग्रामपंचायतीच्या  सरपंच पदाच्या निवडणुकीत चित्रलेखा ढोले विजयी झाल्या. त्या ग्रामपंचायतींवर सदस्यपदाच्या निवडणुकीत ६ राष्ट्रवादी काँग्रेस व ७ भाजपचे सदस्य निवडून आले. बेलवाडी ग्रामपंचायतींवर भाजपाची सत्ता आली. तेथे भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार यांच्या पत्नी मयुरी जामदार सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या मंगला बाळासाहेब व्यवहारे विजयी झाल्या. थोरातवाडी ग्रामपंचायतीवर निर्विवादपणे भाजपचा झेंडा फडकला. सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपच्या साधना संतोष निकम विजयी झाल्या. तर भाजपचे ७ सदस्य निवडून आले.

इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायत च्या निवडणुकीत विजयी झालेले सरपंच पदाचे उमेदवार :

१) बिजवडी - कोमल कचरे, २) गंगावळण - प्रसन्न गलांडे, ३) सराटी - आनिसा अमीर तांबोळी, ४) न्हावी- आशा दीपक डोंबाळे, ५) डिकसळ - मनीषा गवळी, ६ कुरवली- राहुल चव्हाण, ७ रेडणी- हिरा खाडे, ८) म्हसोबावाडी - राजेंद्र राऊत, ९) मानकरवाडी- शिर्के महादेव हनुमंत, १०) रणमोडवाडी- योगेश खरात, ११) बोरी - मंदा डोंबाळे, १२) कळाशी- रूपाली राजेंद्र गोलांडे, १३) पिंपरी खुर्द - शिरसोडी – राजेंद्र चोरमले, १४) माळवाडी - मंगल बाळासाहेब व्यवहारे, १५) अजोती- सुगाव- अमित काटे, १६ हिंगणगाव- रसिका आरडे, १७) मदनवाडी - अश्विनी बंडगर, १८) पडस्थळ -वैशाली पांडुरंग मारकड, १९) बेलवाडी - मयुरी शरद जामदार, २०) डाळज ३- अमित अर्जुन जाधव, २१) झगडेवाडी- अतुल गौतम झगडे, २२) लाखेवाडी - चित्रलेखा श्रीमंत ढोले, २३) डाळज नं. १- माधुरी महेश जगताप, २४ ) थोरातवाडी - साधना संतोष निकम, २५) डाळज २- शकुंतला सुरेश राऊत, २६) जांब-समाधान गायकवाड

खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व- (गाव आणि संरपंच)

शिरोली: सरपंचपदी मुदिता संजय देखणे
गारगोटवाडी: सरपंचपदी वर्षा मनोहर बच्चे
कोरेगाव बु: सिमा राजू झांबरे.
देवोशी: लिला देवरामलव्हाळे
साकुर्डी: रोहिणी शंकर गवारी.
आभू: वच्छला ज्ञानदेव कांबळे.
अनावळे: अश्विनी भानुदास.
येणिये खु: अनिता योगेश जाधव
पापळवाडी: राजू मारूती शिंदे.
मिरजेवाडी: सविता विलास पोखरकर
वाडा: रुपाली शिवाजी मोरे
चास: विनायक भाऊसो मुळूक
बाहिरवाडी : वसुधा अंकुश राक्षे.
सुरकुंडी: कल्पना मयुर लोखंडे.
सिद्धेगव्हाण : दौलत बाळा मोरे 
शेलगाव:  वैशाली संतोष आवटे
साबळेवाडी:  पाटकर गणेश मारुती पाटकर
आव्हाट: मोहिनी गणेश मोरे
 कोरेगाव खुर्द :आरती सुरेश काळे
बहूळ: अश्विनी संदीप साबळे

न्यु अहिरे ग्रामपंचायतीच्या संरपंचपदासाठी आरती युवराज वांजळे यांचा विजय; निकालानंतर पती युवराज वांजळे यांनी आरती यांना उचलून आनंद साजरा केला

- मुळशीत राष्ट्रवादीचा बोलबाला. एकूण अकरा पैकी 8 ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे अन्य तीन पैकी एक जागा रिक्त तर दोन ग्रामपंचायती पक्षविरहित. एकूण 11 पैकी 5 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या.

- राहूबेट परिसरातील तीन ग्रामपंचायतीमध्ये (देवकरवाडी, दहिटणे, पाटेठाण, नांदुर) आमदार राहुल कुल गटाचे निर्विवाद वर्चस्व.

- खेडच्या पूर्व भागातील पाचही ( सिद्धेगव्हाण, दौंडकरवाडी, शेलगाव, बहुळ, साबळेवाडी) ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे वर्चस्व. 

- भोर तालुक्यात ३० पैकी २५ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले. यात १३ ग्रामपंचायतीवर काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी विजय मिळवला आहे तर ७ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने तर ५ ग्रामपंचातीवर शिवसेने विजय मिळवला आहे.

- झगडेवाडी (ता‌. इंदापूर) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरपंचपदाचे उमेदवार अतुल झगडे विजयी.

- साबळेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गणेश मारुती काटकर विजयी.

- वडगाव मावळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सात ग्रामपंचायतीवर झेंडा फडकला. अजून दोन गावची मतमोजणी सुरू. देवले, इंदोरी, कुणेनामा, वरसोली, निगडे, सावळा व शिरगाव या सात ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच विजयी झाले आहेत.

- शेलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली संतोष आवटे विजयी

- सिद्धेगव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत बाळासाहेब मोरे विजयी 

- वरसोली ग्रामपंचायतीचंया सरपंचपदी संजय खांडेभरड हे विजयी झाले आहे. खांडेभरड यांनी विजयाची हॅट्रीक केली आहे. सलग तीसर्‍यांदा ते विजयी झाले आहेत. 

भोर तालुक्यात ३० पैकी १५ ग्रामपंचायत निकाल जाहीर काँग्रेसकडे ८, राष्ट्रवादीकडे ३, तर चार स्थानिक विकास आघाडीकडे.

- लोणावळा शहराच्या लगतच्या कुणेनामा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा संदीप उंबरे ह्या विजयी झाल्या आहेत. कुणेनामा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी चार महिला रिंगणात होत्या. अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत अखेर सुरेखा उंबरे यांनी बाजी मारली आहे. 

- कार्ला विभागातील देवले ग्रामपंचायती सरपंचपदाच्या उमेदवार वंदना आंबेकर 221 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना ५८२ मते मिळाली. देवले ग्रामपंचायतीचे सर्व सात सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग या सरपंच पदासाठी तीन महिला रिंगणात होत्या. 

- दौंडकरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सीताराम आनंदा गुजर ११० मतांनी विजयी

- हवेली तालुक्यातील भुरके गाव भाजपच्या हाती रूपाली रूपाली संदीप थोरात

- बहुळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या आश्विनी संदीप साबळे विजयी

- दौंड तालुक्यातील दहिटणे ग्रामपंचायत सरपंचपदी आमदार राहुल कुल समर्थक (BJP) आरती गायकवाड १६३ मतांनी विजयी.

- दौंड तालुक्यातील देवकरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारतीय जनता पार्टीच्या तृप्ती दिगंबर मगर विजयी

- कारी काँग्रेसकडे सरपंचपदी सतिष ढेबे ४७५ मतानी विजयी

- कर्नावड गावच्या सरपंचपदी काँग्रेसच्या सोनाली राजिवडे १९७ मतांनी विजयी

- आंगसुळे ग्रामपंचायत सरपंचपदी काँग्रेसच्या राणी शशीकांत किरवे ८५ मतांनी विजयी

- ब्राम्हणघर सरपंचपदी रंजना सिताराम धुमाळ काँग्रेस विजयी

- इंदोरी ग्रामपंचायत सरपंचपदाचे राष्ट्रवादी काँग्रेस शशिकांत शिंदे विजयी

वडगाव : पहिल्या मत पेटीचे पूजन करून मतदान मोजनीला सुरवात
वडगाव : पहिल्या मत पेटीचे पूजन करून मतदान मोजनीला सुरवात

Web Title: Gram Panchayat Results in Pune Live 221 gram panchayat ncp congress shivsena bjp mns aap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.