याबाबत सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, निरगुडसर, पारगाव, मेंगडेवाडी व आदी गावात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्याने काही व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. वरील गावामध्ये जिल्हा परिषद व माध्यमिक विद्यालयांच्या शिक्षकांना कोरोनाचा सर्व्हे घरोघरी जाऊन करण्याची जबाबदारी तहसीलदार रमा जोशी व गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली आहे. मात्र, गावागावांत नेमणूक केलेले अधिकारी, ग्रामसेवक व तलाठी दररोज व १० ते ५ या वेळेत गावात हजर नसतात. त्यामुळे शिक्षकांना सर्व्हे करण्यात अडचणी निर्माण होतात. बहुतांशी तलाठी बाहेरगावी राहत असल्याने ग्रामसेवक व तलाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेतात व आल्यानंतर अहवाल व कागदपात्रांवर सह्या करत आहेत.
ग्रामसेवक, तलाठीअभावी सर्व्हेला अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 4:11 AM