इंदापूर : तालुक्यातील पंचायत समिती विस्तार अधिकारी घनश्याम दराडे हे कामगारांचे आर्थिक, मानसिक संतुलन बिघडवून खच्चीकरणकरीत असल्याने त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करावे, या मागणीसाठी इंदापूर तालुका महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने सोमवारी (दि. २०) पंचायत समितीच्या प्रांगणात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचेमुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन स्वरूपात नोटीस देण्यास आले आहे.युनियनच्या वतीने तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले आहे. आंदोलनाच्या चौथ्या टप्प्यात २७ आॅगस्टपासून ग्रामसेवक काम बंद आंदोलन करतील आणि जोपर्यंत विस्तार अधिकारी यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन माघार घेणार नाहीत.मुख्याधिकारी यांच्याकडील चौकशीच्या आदेशातील मुद्द्यांशिवाय अनावश्यक मुद्द्यांची तपासणी करून ग्रामसेवकांचे मानसिक संतुलन बिघडविणे व खच्चीकरण करणे, तपासणीकामी दप्तरांची तपासणी न करता ‘दप्तर उपलब्ध नाही’ असा अहवाल तयार करणे, ग्रामसेवकांना कामकाजासंबंधी मार्गदर्शन न करणे, ग्रामसेवकांचा चुकीचा अहवाल तयार करून निलंबन करण्याची धमकी देणे, ग्रामसेवकांची तपासणीच्या नावाखाली आर्थिक पिळवणूक करून मनमानी कारभार करणे, ग्रामसेवकांचे दप्तर तपासण्यासाठी घरी घेऊन जाणे, तपासणीकामी दप्तरात उपलब्ध असताना ‘नाही’ असा अहवाल तयार करणे, वरिष्ठ अधिकाºयांना हाताशी धरून ग्रामसेवकांना निलंबनाची धमकी देणे, वेगवेगळी कारणे सांगून वरिष्ठांच्या नावाखाली वर्गणी गोळा करणे असे आरोप युनियनच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष नीलकंठ गिरी यांनी दिली. या वेळी युनियनचे सचिव लक्ष्मीकांत जगताप, उपाध्यक्ष संजय यादव, अरुण आवळे, महिला उपाध्यक्षा अर्चना लोणकर, सहसचिव अमोल मिसाळ आदी तालुक्यातील ग्रामसेवक धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.ग्रामसेवकांनी केलेल्या तक्रारींचे स्वागत असून, मी निवेदन वाचले आहे. झालेल्या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- करणसिंह घोलप, सभापतीइंदापूर पंचायत समिती
ग्रामसेवक युनियनचे इंदापुरात धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:24 AM