बारामती : प्रशासनावर वचक असणाऱ्या उपमुख्यमंत्री 'अजितदादां' च्या बारामती तालुक्यातच काही ग्रामसेवक उदासीनतेने कामकाज करीत असल्याची तक्रार उच्चशिक्षित डॉक्टर असणाऱ्या महिला सरपंचांनी केली आहे. तालुक्यातील मेडद गावच्या सरपंच डॉ उज्वला पांडुरंग गावडे यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घालत तक्रार आहे.कामे न करणाऱ्या , भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवकांना निलंबित करण्याची मागणी डॉ गावडे यांनी केली आहे.याबाबत त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना देखील निवेदन दिले आहे.त्यामुळे ग्रामपंचातीची विदारक अवस्थेवर चर्चा रंगली आहे. सरपंच डॉ गावडे यांनी बारामती पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनानुसार, अजित पवार यांच्यासारखे कर्तबगार व प्रशासनावर वचक व जनतेची तत्परतेने कामे करणारे नेते अहोरात्र काम करतात.मात्र, बारामती तालुक्यात मात्र ग्रामपंचायतीच्या कारभाराची अवस्था भयावह व विदारक आहे.मौजे मेडद व इतर तालुक्यातील ग्रामपंचायती फक्त १ ते २ तास उघड्या असतात.वास्तविक या ग्रामपंचायती सकाळी १० ते सायं.६ वाजेपर्यंत खुल्या असणे आवश्यक आहे,ग्रामसेवक पूर्ण वेळ हजर असावेत,नियुक्तीच्या ठिकाणी त्यांनी राहावे,कामगारांवर ग्रामसेवकांचा अंकुश हवा,ग्रामसेवकांवर गटविकास अधिकारी यांचा अंकुश हवा,ग्रामसेवकांनी तेथून दिलेली कामे तत्परतेने करावीत,जे ग्रामसेवक कामे करत नाहीत,टाळाटाळ करतात,भ्रष्टाचार करतात, वरिष्ठ कार्यालयास खोटी माहिती देवून दिशाभूल करतात त्यांना तात्काळ निलंबित करावे. कर्मचारांच्यावर ग्रामसेवक कार्यवाही करत नाहीत. ग्रामसेवकावर वरिष्ठ कार्यालय कार्यवाही करत नाही.या प्रशाशनाच्या सुस्त,ढिसाळ कारभार बदलायला हवा.नुसत्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाहीत, आज सध्या २१ व्या शतकातील प्रगत भारत देशात ग्रामपंचायतीत असा कारभार चालत असेल तर देशाची प्रगती कधी होणार,असा सवाल सरपंच डॉ गावडे यांनी केला आहे. —————————————————... गाव सुधारेल तर देश सुधारेलह्यगाव सुधारेल तर देश सुधारेलह्ण तरी आपण ग्रामपंचायतिचा कारभार सुधारण्यासाठी संबंधितावर आदेश व कार्यवाही करावी. तसेच मौजे-मेडद ग्रामसेवकांची अर्धवट कामे पूर्ण झाल्यानंतर व नवीन ग्रामसेवक नियुक्त झाल्यानंतर,सरपंचाच्या संमतीने रजेवर पाठवावे,अशी मागणी सरपंच डॉ गावडे यांनी केली आहे.या बाबत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठविले आहे.शिवाय प्रत्यक्ष भेटुन तालुक्यातील वास्तव मांडणार असल्याचे मेडद च्या सरपंच डॉ पांडुरंग गावडे यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलताना सांगितले.
प्रशासनावर " वचक " असणाऱ्या अजितदादांच्या तालुक्यातच ग्रामसेवक ढिम्म
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 8:32 PM
उच्चशिक्षित डॉक्टर सरपंचांची थेट मुख्याधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार
ठळक मुद्देकामे न करणाऱ्या ,भ्रष्टाचारी ग्रामसेवकांना निलंबित करा